Loksabha Election  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : सख्ख्या भावा-बहिणीत संघर्ष

आंध्र प्रदेशातील बहीण-भावाचा संघर्ष आता अधिकच टोकदार झाला आहे. येथे चुलत नव्हे तर सख्खे-बहीण भाऊ परस्परांच्या विरोधात आहेत. वडिलांचा राजकीय वारसा आपल्या वाट्याला यावा यासाठी बहिण-भावामध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

विजयवाडा : आंध्र प्रदेशातील बहीण-भावाचा संघर्ष आता अधिकच टोकदार झाला आहे. येथे चुलत नव्हे तर सख्खे-बहीण भाऊ परस्परांच्या विरोधात आहेत. वडिलांचा राजकीय वारसा आपल्या वाट्याला यावा यासाठी बहिण-भावामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. दोघेही एकमेकांविरोधात रोज टीका करत आहेत. हा वाद भारतातले सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि त्यांची बहीण शर्मिला यांच्यातील आहे.

जगनमोहन रेड्डींच्या आंध्रातल्या सत्तेला चंद्राबाबू नायडू आणि पवनकल्याण यांनी आव्हान दिले असतानाच त्यांची बहीण वाय.एस.आर.शर्मिला यांनी काँग्रेसतर्फे कडप्पा या पारंपारिक मतदारसंघात भावाच्या पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस या राज्यात पाय पसरू पाहतो आहे.

२००९ साली आंध्र प्रदेशात कमालीचे लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे विमान कोसळून अपघाती निधन झाले त्यानंतर येथील आमदारांनी जगन यांना मुख्यमंत्री करा अशी एकमुखी मागणी केली पण ती काँग्रेस श्रेष्ठींनी नाकारली. त्यानंतर त्यांनी केलेल्या सांत्वन यात्रेत शर्मिला भावासमवेत होत्या.

त्यानंतर २०१९ मध्ये जगनमोहन रेड्डी हे आंध्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शर्मिला आणि जगनमोहन यांच्यात दुरावा वाढला. कर्नाटकातील कौटुंबिक मालकीच्या वादातून या दोघांत वितुष्ट निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.कर्नाटकातील एका बड्या काँग्रेस नेत्याने हा वाद वाढविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली असे बोलले जात आहे. त्यामुळेच शर्मिला यांनी काँग्रेसची वाट धरली.

राजशेखर यांचे सख्खे भाऊ विवेकानंद रेड्डी यांच्या खुनाशी जगनमोहन यांचे नाव जोडले जाते आहे. हा आरोप फक्त दबक्या आवाजातल्या राजकीय चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर शर्मिला यांनी या हत्येचा संबंध थेट भावाशी जोडला. याबद्दल अखेर न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि निवडणूक प्रचारात विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येचा उल्लेख करण्यास शर्मिला यांना मनाई करण्यात आली. मात्र भावाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या निश्चयाबाबत शर्मिला अजूनही ठाम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT