Election Commission of India sakal
लोकसभा २०२४

Election Commission of India : निवडणुकीवर आयोगाचे विशेष लक्ष ; माजी अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा आणि उमेदवारांच्या खर्चांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा आणि उमेदवारांच्या खर्चांवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात २८ मार्चला निवडणूक आयुक्त राजीवकुमार, ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांची बैठक झाली होती.

त्यात विशेष निरीक्षक पाठविण्याचे ठरले होते. निवडणूक आयोगातर्फे आज याबाबतची औपचारिक घोषणा करण्यात आली. सात कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि बिहार या चार राज्यांमध्ये त्यासोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी विशेष निरीक्षक पाठविण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेचा अनुभव असलेल्या आणि उत्कृष्ट सेवाकाळ राहिलेल्या माजी सनदी अधिकाऱ्यांकडे या विशेष निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये धनशक्ती, दंडेलशाही आणि अपप्रचार यासारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विशेष निरीक्षक पाठविण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निरीक्षकांची कामे

  • राज्यांच्या मुख्यालयांत मुक्काम अन् दौरे

  • स्थानिक प्रशासनात समन्वयाचे काम

  • सर्वपक्षीय उमेदवारांना समान संधी देणे

  • निवडणुकीतील पैशाचा गैरवापर रोखणे

  • उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवणे

  • आर्थिक प्रलोभनांना पायबंद घालणे

राज्यातील जबाबदारी

  • धर्मेंद्र एस. गंगवार

  • एन. के. मिश्रा

अन्य राज्यांतील जबाबदारी

  • मनजितसिंग आणि विवेक दुबे (बिहार)

  • अजय व्ही. नायक आणि मनमोहनसिंग (उ. प्र.)

  • राममोहन मिश्रा आणि दीपक मिश्रा (आंध्रप्रदेश)

  • योगेंद्र त्रिपाठी आणि रजनीकांत मिश्रा (ओडिशा)

  • आलोक सिन्हा, अनिलकुमार शर्मा (प. बंगाल)

बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांतील दोन पोलिस महासंचालक, आठ जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि बारा पोलिस निरीक्षकांची बदली केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अन्य आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यभार अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवावा, असे आयोगाने निर्देशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अनिकेत कोथळेची पोलिस कोठडीत हत्या, त्याचा मृतदेह जाळला आंबोलीत'; उज्ज्वल निकम यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद, आरोपी लाडनं पोलिसांना असं काय दाखवलं?

Crime News: लग्नाच्या आशेने घरातून निघाली, पण वाटेतच संपलं आयुष्य; भयानक गुन्ह्याने देश हादरला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवड ९ मार्चला होणार

Bizouli Holi: रंग विसरा, इथे चालतात शस्त्रे! अणकुचीदार हत्यारांनी टोचून घेतात शरीर; ५०० वर्षांची ही परंपरा पाहून उडेल तुमची झोप

Top 5 Engineering Colleges Maharashtra: इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्र का आहे पहिली पसंती? जाणून घ्या टॉप 5 कॉलेज

SCROLL FOR NEXT