Sunil Tatkare sakal
लोकसभा २०२४

Sunil Tatkare : महायुतीच्या प्रचारात ‘राष्ट्रवादी’ सक्रिय; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नाशिकमध्ये दावा

नाशिकची लोकसभा उमेदवारी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश आले हे मान्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगितले. ‘‘महायुतीचा उमेदवार घोषित करण्यास उशीर झाल्याने प्रचारात शिथिलता आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकची लोकसभा उमेदवारी मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश आले हे मान्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी सांगितले. ‘‘महायुतीचा उमेदवार घोषित करण्यास उशीर झाल्याने प्रचारात शिथिलता आली आहे. मात्र आता आम्ही महायुतीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी प्रचारात सक्रिय आहे,’’ असा दावा त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याने ते मुंबईतील महायुतीचा ‘रोड शो’, सभांना हजर नव्हते, असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले. नाशिक लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचारात दिसत नसल्याची चर्चा आहे. यातच, पिंपळगाव बसवंत येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेलाही उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. या पार्श्वभूमीवर तटकरे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना योग्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेत भाषणावेळी शेतकऱ्याने कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. यावर विचारले असता तटकरे म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहेत. आचारसंहिता संपल्यावर यावर योग्य निर्णय घेतला जाईल. भुजबळांनी देखील याबाबत पंतप्रधान मोदी यांना पत्र दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT