VVPAT 
लोकसभा २०२४

VVPAT पावत्यांची शंभर टक्के मोजणी होणार? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यातच विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम शंका व्यक्त करत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. त्यातच विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम शंका व्यक्त करत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी होऊ लागली आहे. पण याला निवडणूक आयोगानं विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर आता मतदानात पारदर्शकता राहावी यासाठी ईव्हीएमला जोडलेल्या व्हीव्हीपॅट मशिनमधील पावत्यांची शंभर टक्के मोजणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल झाली आहे. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला नोटिस पाठवली असून याबाबत मत मागवलं आहे. (Supreme Court Issues Notice To ECI On Plea For 100 percent EVM Votes VVPAT Verification)

‘असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ADR) या संस्थेने याबाबत याचिका केली आहे. या याचिकेत म्हटलं की, लोकसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशीनसोबत असलेल्या व्हीव्हीपॅट पावत्यांची १०० टक्के मोजणी करण्यात यावी. (Latest Marathi News)

सध्याच्या नियमानुसार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रांतील कोणत्याही पाच ईव्हीएम मशीनमधून व्हीव्हीपॅटची (व्होटर्स व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) पावत्यांची मोजणी केली जाते. प्रत्येक ईव्हीएम मशीनमधील व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्यासाठी अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यास हे काम केवळ पाच ते सहा तासांत पूर्ण होऊ शकेल, असा युक्तिवाद ‘एडीआर’नं केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT