Uddhav Thackeray sakal
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray : ‘भवानी’ शब्द गीतातून काढणार नाही ; ठाकरेंनी आयोगाला ठणकावले

‘‘मोदी आणि शहा यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्हाला मात्र मशाल गीतातील ‘जय भवानी’ हा शब्द काढून टाकण्यासाठी नोटीस बजावली जाते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २१ : ‘‘मोदी आणि शहा यांच्याकडून उघड-उघड हिंदुत्वाचा प्रचार सुरू असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्हाला मात्र मशाल गीतातील ‘जय भवानी’ हा शब्द काढून टाकण्यासाठी नोटीस बजावली जाते. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा शब्द गीतातून काढणार नाही,’’ असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावून सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या पक्षाने तयार केलेल्या मशाल गीतामधील ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ हे शब्द काढण्यासाठी आयोगाने नोटीस बजावली आहे. त्याबाबत संताप व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले,‘‘जय भवानी, जय शिवाजी ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द तुम्ही काढायला लावत आहात.

उद्या तुम्ही ‘जय शिवाजी’ काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही याच्या विरोधातच लढत आहोत, लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत आमच्या गीतातून ‘जय भवानी’ शब्द काढला जाणार नाही.’’ निवडणूक आयोगाने जर आमच्यावर कारवाई करण्याचे ठरवले तर आधी मोदी आणि शहांवर कारवाई करावी लागेल; मग ते आमच्या महाराष्ट्राच्या दैवतेचा अपमान कसा करतात ते पाहू, असे आव्हानही ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे आम्ही देखील असा प्रचार केला, तर तुम्हाला कारवाई करता येणार नाही, असेही ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सांगितले.

ते ‘बजरंग बली’च्या नावाने मते मागतात

निवडणुकीत धर्माच्या मुद्द्यावर प्रचार करणे, नियमांच्या विरुद्ध आहे. असे असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा हिंदुत्वाचा प्रचार करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले,‘‘मध्य प्रदेश निवडणुकीच्या वेळेस ‘बजरंग बली’च्या नावावर मत द्या, असे वक्तव्य मोदी यांनी केले होते. याशिवाय, ‘आम्हाला मत दिल्यास रामलल्लाचे मोफत दर्शन देऊ’, असे अमित शहा जाहीर सभेत बोलले होते. तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? यावर निवडणूक आयोगाने उत्तर न दिल्यास आयोगाने नियम बदलला आहे, असे समजले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT