किशोर गजभिये  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : किशोर गजभिये ‘वंचित’ ; उमेदवारी अर्ज झाला बाद

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच रामटेकचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांच्याऐवजी वंचित बहुजन आघाडीने शंकर चहांदे यांना पसंती दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच रामटेकचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांच्याऐवजी वंचित बहुजन आघाडीने शंकर चहांदे यांना पसंती दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.

किशोर गजभिये यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती; मात्र माजी मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यांनी रश्मी बर्वे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. केदारांचा हट्ट काँग्रेसच्या नेत्यांनी पुरवल्याने गजभिये यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी देण्याचे जाहीरसुद्धा केले होते. तत्पूर्वी वंचितच्या वतीने भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनीही उमेदवारी दाखल केली होती. गजभिये यांनी उमेदवारी अर्ज भरतात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या. गजभिये यांच्या दावेदारीमुळे किशोर गजभिये ‘वंचित’

काँग्रेसच्या मतांचे विभाजन होणार असल्याने त्यांनी माघारी घ्यावी, असा दाबाव टाकला जात होता. काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आले. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्याऐवजी चहांदे यांना पसंती दिली. गजभिये यांनाही वंचितने एबी फॉर्म दिला होता.

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या नावाला उघडपणे विरोध केला होता.

राहुल गांधी यांच्याशी बोलून त्यांची उमेदवारी रद्द करण्याचाही प्रयत्न झाला. या सर्व घडामोडी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झाल्या. राऊत यांना पुरेसा वेळ मिळाला नाही आणि निवडणूक अधिकारी यांनी फॅक्सवर आलेला एबी फॉर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने राऊत यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. गजभिये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार झाल्यानंतरही केदार-राऊत यांच्या जोडीने निवडणुकीत काम केले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT