Lok Sabha Election Voting sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Voting : उत्साहात मतदान ; राज्यात अनेक ठिकाणी टक्केवारी वाढली

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांसह दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांत आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४.४३ टक्के मतदान झाले. राज्यात ढगाळ वातावरण असल्याने दुपारीही मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांसह दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांत आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६४.४३ टक्के मतदान झाले. राज्यात ढगाळ वातावरण असल्याने दुपारीही मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या. इतर राज्यांच्या महाराष्ट्रात तुलनेने कमी मतदान झाले. संध्याकाळी पाचपर्यंतची मतदानाची टक्केवारी निराशाजनक असली तरी, त्यानंतर मतदारांनी मोठ्याप्रमाणावर मतदान केल्याने अनेक मतदारसंघांत मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान झाले.

पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, बीड, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना व औरंगाबाद या ११ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार, जालना आणि बीड जिल्ह्यांत झाले. संध्याकाळनंतर मतदारांनी गर्दी केल्याने मतदानाची वेळ उलटून गेल्यावरही या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या.

त्यामुळे मागील तीन टप्प्यांप्रमाणे यावेळीही मतदानाच्या अंतिम टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. देशातील ९६ मतदारसंघातील १,७१७ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. आंध्र प्रदेशातील २५, तेलंगणमधील १७, उत्तर प्रदेशातील १३, प. बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी आठ, बिहारमधील पाच, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी चार तर जम्मू काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान झाले. या टप्प्यातील मतदानानंतर ३७९ मतदारसंघातील मतदान पार पडले आहे. आंध्रमध्ये १७५ विधानसभेच्या जागांसाठीही आज मतदान पार पडले आहे.

काही ठिकाणी हिंसक घटना

  • आंध्र प्रदेश : अनेक ठिकाणी हिंसक घटना

  • आंध्र प्रदेश : गुंटूरचे आमदार व्ही. शिवकुमार यांची एका मतदारासोबत हाणामारी

  • उत्तर प्रदेश : काही गावांतील लोकांचा मतदानावर बहिष्कार

  • प. बंगाल, ओडिशा : ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी

  • प. बंगाल : गैरप्रकार झाल्याच्या भाजप आणि तृणमूलकडून तक्रारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बैठक, कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर होणार निर्णायक चर्चा ?

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातवर चौदावा गुन्हा दाखल; सिन्नर पोलिसांकडून तपास सुरू

नीलेश लंकेंनी न्यायालयीन लढाईसुद्धा जिंकली, सुजय विखे पाटलांना दणका

Pimpri News : हक्काच्या घराचे स्वप्न उद्योगनगरीत पूर्ण; ‘पीएमआरडीए’मुळे एक हजार कुटुंबांना घरकुल

Beed News: इकडे आड, तिकडे विहीर; अनेक रस्त्यांवर ब्लॅकस्पॉट; विहिरी ठरतात अपघातांचे कारण

SCROLL FOR NEXT