this lok sabha election 73 women political leader win bjp congress Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result 2024 : नव्या लोकसभेत ७३ महिला सदस्य

सर्वाधिक ६९ महिलांना भाजपने संधी दिली होती, त्याखालोखाल ४१ महिलांना काँग्रेसने संधी दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ७३ महिलांनी विजय मिळविला. सर्वाधिक ११ महिला पश्‍चिम बंगालमधून निवडून आल्या आहेत. गेल्यावेळी, २०१९मध्ये ७८ महिला लोकसभेत गेल्या होत्या.

महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या विधेयकाची अंमलबजावणी अद्याप व्हायची आहे. यावेळी ७९७ महिला उमेदवार रिंगणात उतरल्या होत्या.

सर्वाधिक ६९ महिलांना भाजपने संधी दिली होती, त्याखालोखाल ४१ महिलांना काँग्रेसने संधी दिली होती. भाजपच्या ३०, काँग्रेसच्या १४, तृणमूलच्या ११, समाजवादी पक्षाच्या चार, द्रमुकच्या तीन आणि संयुक्त जनता दल आणि एलजेपी(आर)च्या प्रत्येकी दोन महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत.

यामुळे १८ व्या लोकसभेतील महिलांच्या प्रमाणाची टक्केवारी १३.४४ झाली आहे. १७ व्या लोकसभेत ७८ महिला सदस्य होत्या. त्याच्या एकूण जागांच्या प्रमाणातील टक्केवारी १४ होती. १६व्या लोकसभेत ६४, तर १५ व्या लोकसभेत ५२ महिला सदस्य होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभेत प्रत्येकी २४ महिला खासदार होत्या.

प्रिया सरोज सर्वांत तरुण खासदार

समाजवादी पक्षाच्या प्रिया सरोज (वय २५) आणि कैरानातून निवडून आलेल्या इकरा चौधरी (वय २९) या सर्वांत तरुण खासदार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT