Loksabha Election  esakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : यादी लांबली... उत्सुकता ताणली; इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते अस्वस्थ, नजरा लागल्या मुंबई-दिल्लीकडे

राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महायुती (Mahayuti) विरुध्द महाविकास असाच सामना निश्‍चित आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या राज्यभरातील उमेदवारांची मतदार संघनिहाय घोषणा आज (ता. २१) होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) महाविकाससह महायुतीचा निर्णय लांबत गेल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. निवडणूक जाहीर होऊनही उमेदवार व जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने इच्छुकांसह कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. यादीसाठी कार्यकर्त्यांच्या नजरा मुंबई -दिल्लीकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महायुती (Mahayuti) विरुध्द महाविकास असाच सामना निश्‍चित आहे. महायुती जिल्ह्यातील दोन्ही जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दावा सांगितला आहे, तर दुसरीकडे यापैकी एक जागा मिळावी यासाठी भाजप (BJP) आग्रही आहे.

उमेदवार शिंदे गटाचा पण चिन्ह ‘कमळ’ असावे यासाठी लॉबिंग सुरू आहे. पण शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांनाच उमेदवारी नको, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शिंदे गटाच्या सर्व खासदारांशी शिंदे यांनी काल मुंबईत चर्चा केली. आज काहींनी त्यागाची तयारी ठेवावी, असे सांगत शिंदे यांनी खासदारांचे टेन्शन वाढवले आहे. परिणामी महायुतीची यादी लांबत चालली आहे. त्यातून इच्छुकांसह कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.

महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे उमेदवार निश्‍चित असले तरी त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. हातकणंगलेत स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीतच मतभेद आहेत. शेट्टी यांनी ‘मशाल’ चिन्हावर लढावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आग्रही आहेत, त्याला शेट्टी यांचा नकार आहे. प्रसंगी एकटे लढू पण महाविकास आघाडीत जाणार नाही यावर ते ठाम आहेत. त्याचवेळी शेट्टी यांना बाहेर पाठिंबा देण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे, तशा चर्चा मुंबई व दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या बैठकीत होत आहेत.

त्यातच सांगलीच्या जागेवर शिवसेना-काँग्रेस यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. परिणामी महाविकास आघाडीचाही निर्णय लांबत चालला आहे. काँग्रेसकडून शाहू महाराज यांनी थेट प्रचारालाच सुरुवात केल्याने त्यांची उमेदवारी निश्‍चित समजली जाते, पण महायुतीचा उमदेवार व जागा वाटप निश्‍चित होत नाही तोपर्यंत संभ्रमावस्था कायम रहाण्याची शक्यता आहे. जेवढ्या लवकर उमेदवारांची घोषणा होईल, तेवढी तयारीला संधी मिळणार असल्याने इच्छुकांसह नेते दिल्लीकडे डोळे लावून आहेत.

आज घोषणा शक्य

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या राज्यभरातील उमेदवारांची मतदार संघनिहाय घोषणा आज (ता. २१) होण्याची शक्यता आहे. आज त्यासाठी दिल्लीत काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक झाली. त्याला राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेतेही उपस्थित होते. त्यात सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य सहा जागांवरील उमेदवार जवळपास निश्‍चित झाले आहेत. त्यात बाळू धानोरकर यांच्या पत्नींचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT