Deepak Kesarkar esakal
लोकसभा २०२४

'मला राष्ट्रवादी सोडताना वाईट वाटलं, पण शरद पवारांना भेटण्यासाठी..'; राऊतांवर टीका करत काय म्हणाले केसरकर?

खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याबद्दल जनतेत नाराजी आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस सोबत गेल्यानेच त्यांच्यावर कमी जागा लढविण्याची वेळ आली आहे.

सावंतवाडी : खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्याबद्दल जनतेत नाराजी आहे. केवळ आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळेच व मदतीमुळेच ते खासदार म्हणून निवडून आले; मात्र त्यांना उपकाराची जाण नसल्यानेच व पराभव डोळ्यांसमोर दिसू लागल्याने ते माझ्या विरोधात भाषण करून बेताल वक्तव्य करत आहेत. लवकरच त्यांच्याकडे एवढा वेळ असेल की, त्यांना केवळ भाषण करण्यासाठीच फिरावं लागेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लगावला.

मला राष्ट्रवादी सोडताना वाईट वाटले; मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटण्यासाठी मला आगाऊ वेळ घेण्याची गरज पडत नाही. माझ्या विरोधात काय बोलायचे, ते पवार ठरवतील. राऊतांना कोणी सुपारी दिली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर आदी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, ‘‘प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षासाठी उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे. आम्हीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जागा शिवसेनेसाठी मिळावी यासाठी आग्रही आहोत. पडणाऱ्या पक्षाकडे एखादाच उमेदवार इच्छुक असल्याने त्यांची उमेदवारी लगेच जाहीर होते; मात्र निवडून येणाऱ्या जागेसाठी अनेकजण इच्छुक असतात. आमच्याकडेही महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात उशीर होत आहे; मात्र महायुती जो निर्णय घेईल, त्या उमेदवाराचा गावागावात जाऊन प्रचार करेन.

आम्ही विकासाच्या मुद्यावर मत मागणार आहोत. आम्हाला कोणावर टीका करायची गरज नाही. या मतदारसंघात भाजप-शिवसेना व मित्र पक्षांची मोठी ताकद असून माहितीचा उमेदवार सहज निवडून येईल. राऊत यांना पराभव डोळ्यांसमोर दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यांनी माझ्यावर टीका करताना माझ्या उपकारांची जाण ठेवली पाहिजे होती. कारण त्यांच्या विजयात माझा वाटा मोठा होता. केवळ आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळेच व मदतीमुळेच ते खासदार म्हणून निवडून आले. आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंडळींना एकत्र करून गोळा बेरीज करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मी राष्ट्रवादी सोडली तेव्हा मला वाईट वाटले; मात्र मला आजही शरद पवार यांना भेटण्यासाठी आगाऊ वेळ घेण्याची गरज लागत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी सोडली त्याबाबत काय बोलायचे, ते पवार बोलतील; मात्र राऊतांना त्यावर बोलण्याचा कोणी अधिकार दिला. उगाच भाषण ठोकून टाळ्या घेण्यासाठी ते बोलत आहेत. लवकरच त्यांच्याकडे एवढा वेळ असेल की त्यांना केवळ भाषणासाठीच फिरावं लागेल. भाजपसोबत युतीत असताना ठाकरेंना मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या होत्या; मात्र आज बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस सोबत गेल्यानेच त्यांच्यावर कमी जागा लढविण्याची वेळ आली आहे. त्यांच्या महाविकास आघाडीची धोरणं, पवारांची धोरण व उद्धव ठाकरे यांची धोरण काय आहेत याबाबत वरिष्ठांशी बोलून मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व उघड करेन.’’

राणेंना उमेदवारी मिळाल्यास पाठबळ

नारायण राणे ही केवळ व्यक्ती नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळात कोकणातील मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसह कोकणात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. केंद्राचे अनेक प्रकल्प आज त्यांच्यामुळे सिंधुदुर्गात होत आहेत. कोकणातील विकासाची ही गंगा अविरत राहण्यासाठी कोकणाला केंद्रात मंत्री पदाची गरज आहे. फुशारक्या मारणाऱ्या विनायक राऊत यांना सत्तेत असतानाही केंद्रात मंत्रिपद मिळू शकले नाही. त्यासाठी तेवढं वजन असावं लागतं. त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास येथील जनता विकासाच्या मुद्यावर त्यांना नक्कीच पाठिंबा देईल, असा विश्वासही मंत्री केसरकरांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT