Lok Sabha Elections esakal
लोकसभा २०२४

Konkan Lok Sabha Elections : 'कोकणचा कॅलिफोर्निया होऊ दे रे म्हाराजा...'

सध्या निवडणुकीचा कालावधी जसा जवळ येत आहे तसे राजकीय वर्तुळात बदल घडत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सध्या ग्रामीण भागात रात्री पारावार होणाऱ्या चर्चांना ऊत आला आहे. मतदार आपले म्हणणे मांडत आहे.

Lok Sabha Elections : सध्या निवडणुकीचा कालावधी जसा जवळ येत आहे तसे राजकीय वर्तुळात बदल घडत आहेत. जिल्ह्यात मतदारांमध्ये सल्लामसलत सुरूच आहे. शासनातर्फे मतदान हक्कासाठी गावोगावी मतदारांसमोर जनजागृती केली जात आहे. मतदान हे सर्वश्रेष्ठ हक्क आहे आणि तो प्रत्येक नागरिकाने बजावला पाहिजे, असा आशावाद निर्माण करण्यात येत आहे.

एकीकडे ग्रामीण भागांत विकासाच्या वाटा चोखाळल्या गेल्या आहेत. त्याच भागातील कार्यकर्त्यांचे म्हणणे मतदारांपर्यंत पोचत आहे. पण, ज्या दुर्गम भागात विकास झाला नाही त्या त्या ठिकाणी नाराजीचे सूर उमटत आहेत. मतदान करायचे की नाही आणि ते कुणाला? असाच संभ्रम निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी नव्या दमाच्या युवा पिढीने मतदानाचा हक्क आणि मतदान जनजागृती यावर घराघरात जाऊन माहिती देणे महत्वाचे झाले आहे.

विविध पक्षांकडून मतदार बंधू संबोधला जातोय. त्याच्यासमोर विकासाचा लेखाजोखा टाकला जात आहे. आम्ही अमूक करणार तमूक करणार. पण, खुर्ची मिळाली की मतदार कुठेही दिसत नाही. सध्या ग्रामीण भागात रात्री पारावार होणाऱ्या चर्चांना ऊत आला आहे. मतदार आपले म्हणणे मांडत आहे. चार टोळकी एकत्र येऊन गावातील रस्ता, पाणी, वीज यावर चर्चा करतात.

गावातील तात्या गावकार शिमगोत्सवात देवाला गाऱ्हाणं घालतानाही म्हणतोय कोकणचा कॅलिफोर्निया (California) दहा वर्षांत झाला नाही. या पुढे तरी होऊ दे रे म्हाराजा... अशी मागणी देवाजवळ करतोय. देवाजवळ मागणी तर केली जातय, पण कोकणचा कॅलिफोर्निया करण्यासाठी यापूर्वी निवडणुकांमधून झालेल्या घोषणा आणि आता होणाऱ्या घोषणा कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात येतील?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT