Shahu Chhatrapati Maharaj esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : आक्षेपार्ह पोस्टद्वारे शाहू महाराजांची बदनामी; सतेज पाटलांची पोलिसांकडे तक्रार, असं काय आहे SMS मध्ये?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शाहू महाराजांविषयी (Shahu Chhatrapati Maharaj) बदनामी करणारा टेक्स् (केवळ शब्दात) असलेला एसएमएस व्हायरल केला आहे.

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur Lok Sabha Constituency) कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली आहे. याची तक्रार कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. याबाबत लेखी तक्रार केली असून त्याचा तपास करून गुन्हा दाखल करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे. आता प्रचाराला रंगत येत असतानाच शाहू महाराजांविषयी (Shahu Chhatrapati Maharaj) बदनामी करणारा टेक्स् (केवळ शब्दात) असलेला एसएमएस व्हायरल केला आहे. या एसएमएसमुळे शाहू महाराजांची बदनामी होत आहे. याची गंभीर दखल कॉंग्रेस पक्षाकडून घेतली आहे.

जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार पाटील यांनी स्वतः याची तक्रार पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ही तक्रार दिली असून त्या तक्रारीत नेमकी बदनामी कशी केली आहे, याचाही उल्लेख केला आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षकांकडे दोन दिवसांपूर्वीच ही तक्रार देण्यात आली आहे.

त्याची शहानिशा आणि संबंधितांवर काय कारवाई केली, कितीजणांना हा एसएमएस फॉर्वर्ड केला आहे, या मागे कोणाचा हात आहे, याचा तपास कुठंपर्यंत पोचला आहे, याबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सध्या ते चंदगड येथील सीमा नाका तपासणीच्या कामात असल्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळू शकली नाही. पोलिस मुख्यालयातील सायबर सेलच्या निरीक्षकांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT