P. N. Patil esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : भाजपने सरकारी मालकीच्या तब्बल 'इतक्या' संस्था उद्योगपतींना विकल्या; काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

'पंजाबमधील शेतकरी आंदोलनानंतर भाजप सरकारची महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी पडेल अशी भीती वाटते.’

सकाळ डिजिटल टीम

‘केंद्रातील सरकारकडे शेतकरी हिताची दृष्टी नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने स्वीकारली नाही.'

कुडित्रे : ‘दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले होते. त्यानुसार दहा वर्षांत वीस कोटी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करायला पाहिजे होत्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारकडे तरुणाई, शेतकरी हिताची धोरणे नाहीत. तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्याच नाहीत. उलट भाजप सरकारने (BJP Government) फायद्यात असलेल्या सरकारी मालकीच्या २६ संस्था उद्योगपतींना विकल्या. पंतप्रधान मोदी हे कोणासाठी सरकार चालवित आहेत? उद्योगपतींसाठी की सर्वसामान्य लोकांसाठी?,’ असा सवाल आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज (Mahavikas Aghadi Candidate Shahu Maharaj) यांच्या प्रचारार्थ बहिरेश्वर, म्हारुळ, आमशी, पासार्डे, खाटांगळे, चिंचवडे तर्फ कळे, भामटे, कळंबा तर्फ कळे, कोपार्डे, कुडित्रे येथे संपर्क मेळावे झाले. वाकरे येथील सभेत आमदार पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी के. डी. माने होते.

यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले, ‘केंद्रातील सरकारकडे शेतकरी हिताची दृष्टी नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने स्वीकारली नाही. उलट सरकारी यंत्रणांच्या बळावर आंदोलन दडपण्याचा प्रकार केला. पंजाबमधील शेतकरी आंदोलनानंतर भाजप सरकारची महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी पडेल अशी भीती वाटते.’ अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कॅ. उत्तम पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्ही. बी. पाटील, विजय देवणे, विश्वास पाटील, बाबासाहेब देवकर, संभाजी पाटील कुडित्रेकर, दादू कामिरे, संभाजी ज्ञानू पाटील, एकनाथ पाटील, दगडू भास्कर आदींची भाषणे झाली.

मालोजीराजेंच्या तालीम संस्थांना भेटी

कोल्हापूर : ‘सर्वसामान्य नागरिक, तालमी, मंडळे यांच्याशी शाहू छत्रपतींनी कायम संपर्क ठेवला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरची ओळख समतावादी राहावी यासाठी तालमी, मंडळांच्या माध्यमातून जातीय सलोखा राखणाऱ्या शाहू छत्रपतींना लोकसभेत पाठवूया’, असे आवाहन मालोजीराजे यांनी केले.

मालोजीराजे यांनी शनिवारी इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी शाहू महाराजांसोबत राहणार असल्याचे जाहीर केले.मालोजीराजे यांनी शिवाजी पूल, मुळे गल्ली, ख्रिश्चन वसाहत, ब्रह्मपुरी, जुना बुधवार पेठ तालीम मंडळ, तोरस्कर चौक, हळदकर गल्ली, डांगे गल्ली, ढिसाळ गल्ली, परिसरातील मतदारांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

SCROLL FOR NEXT