Kolhapur Lok Sabha Sanjay Mandlik esakal
लोकसभा २०२४

कोल्हापुरात जन्मलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदारच आहे; काय म्हणाले मंडलिक?

कोल्हापूर जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदारच आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘संजय मंडलिक यांनी निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत जा, मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करा. आमचं जे व्हायचे ते होऊ दे.'

नानीबाई चिखली : ‘अवर्षणग्रस्त असलेल्या कागल तालुक्यात हरितक्रांती आणण्याचे काम दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केले. त्यावर कळस चढविण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. विकासाची ही गंगा यापुढे अशीच अविरत सुरू ठेवण्यासाठी तालुक्याचा सुपुत्र आणि स्वाभिमान म्हणून मला मोठे मताधिक्य द्या,’ असे आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केले.

नानीबाई चिखली (ता. कागल) जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मंडलिक बोलत होते. ‘संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही निवडणूक (Kolhapur Lok Sabha) आता कार्यकर्त्यांनीच हातात घ्यावी,’ असे आवाहन या मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘संजय मंडलिक यांनी निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत जा, मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करा. आमचं जे व्हायचे ते होऊ दे. संजय मंडलिक यांना आपण विधानसभेसाठी कोणतीही अट घालू नका. त्यांना प्रचंड मताधिक्य देऊया. त्यांच्या विजयात आपला सिंहाचा वाटा असेल.’

प्रा. मंडलिक म्हणाले, ‘दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा वेदगंगा, दूधगंगा, चिकोत्रा या तिन्ही नद्यांवर धरणे बांधण्याचा आग्रह होता. पाटबंधारेमंत्री झाल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. पुढे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर्तता केली. त्यामुळेच पावसाळ्यानंतर कोरड्याठाक होणाऱ्या नद्या आणि कालवे बारमाही वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदारच आहे.’

सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांनी स्वागत केले. सदाशिव तुकान यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, ‘बिद्री’चे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, दीपाली कुदळे, सुदाम देसाई, भाऊसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंडलिक कारखान्याचे संचालक ॲड. वीरेंद्र मंडलिक, जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले, शशिकांत खोत, विश्वास कुराडे, शहाजी यादव, भूषण पाटील आदी उपस्थित होते. बशीर नदाफ यांनी आभार मानले.

पिक्चर अभी बाकी है...!

संजय मंडलिक म्हणाले, ‘या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या एवढ्या प्रचंड उपस्थितीमुळे माझ्या मोठ्या मताधिक्याची खात्री मला पटलेली आहे. ‘ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है...’ असे म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

Pune Death Penalty: पुण्यातील फाशीच्या शिक्षांचा इतिहास; गाजलेल्या गुन्ह्यांपासून नसरापूर प्रकरणापर्यंत कठोर न्यायाची परंपरा

Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT