Kolhapur Lok Sabha Indira Gandhi esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : इंदिराजींची साथ शंकरराव मानेंना नडली अन् दिल्लीत त्यांची उमेदवारी कापली, असं नेमकं काय घडलं?

१९६९ मध्ये काँग्रेसमध्येच फूट पडली. त्यातून महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची साथ सोडली.

निवास चौगले

माने हे इंदिराजींसोबत राहिल्याची शिक्षा त्यांना मिळाली. त्यातून ते कोल्हापुरात परतताच त्यांचे तिकीट कापण्यात आले.

Kolhapur Lok Sabha : १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून कै. शंकरराव माने (Shankarrao Mane) खासदार झाले. त्यानंतर दोनच वर्षांत म्हणजे १९६९ मध्ये काँग्रेसमध्येच फूट पडली. त्यातून महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची साथ सोडली; पण महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदार हे इंदिराजींच्या (Indira Gandhi) सोबत राहिले. त्यात कै. शंकरराव माने यांचा समावेश होता. त्यातून १९७१ मध्ये त्यांना उमेदवारी जाहीरही झाली; पण केवळ इंदिरांजींचे निष्ठावंत म्हणून दिल्लीत त्यांची उमेदवारी कापण्यात आली. काँग्रेसमधील अंतर्गत बंड हे माने यांच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉईंट’ ठरले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस हा एकमेव पक्ष देशात आणि विविध राज्यांत सत्तेवर होता. १९९५, १९९९ चा अपवाद वगळता २०१४ पर्यंत देशात कधीतरी काँग्रेसचे (Congress) स्वबळाचे, तर कधी आघाडीच्या माध्यमातून सरकार सत्तेवर राहिले. २०१४ पासून मात्र भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे; पण एकहाती सत्ता असूनही काँग्रेसमधील नेत्यांची बंडखोरी तेव्हाही सुरूच होती आणि आजही ती कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. त्याचा फटका मात्र निष्ठावंतांना बसत गेला.

१९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात कोल्हापुरातून शंकरराव माने खासदार झाले; पण दोन वर्षांतच तत्कालिन पंतप्रधान व काँग्रेसच्या नेत्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या विरोधात काही नेत्यांनी बंडाचे हत्यार उपसले. त्यात महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik), ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण, (कै.) वसंतदादा पाटील या माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांचा समावेश होता. त्यावेळी महाराष्ट्रातील केवळ चार खासदार स्वर्गीय इंदिराजींच्या सोबत राहिले. त्यात कराडचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील (कै.) आनंदराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री (कै.) बाबासाहेब भोसले यांचे सासरे सोलापूरचे तुळशीदास जाधव, वर्ध्याचे देवराव पाटील व कोल्हापूरचे माने यांचा समावेश होता.

काँग्रेसमध्ये दोन गट असतानाच १९७१ ची निवडणूक जाहीर झाली. मतदारसंघनिहाय उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया दिल्लीत सुरू झाली. त्याच दरम्यान माने हे दिल्लीतच होते. इंदिराजींची भेट घेऊन त्यांनी आपली उमेदवारी निश्‍चित केली. दिल्लीत त्यांची उमेदवारीही जाहीर झाली म्हणून ते कोल्हापुरात परतले; पण प्रत्यक्ष यादीत (कै.) राजाराम दादासाहेब निंबाळकर यांची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. माने हे इंदिराजींसोबत राहिल्याची शिक्षा त्यांना मिळाली. त्यातून ते कोल्हापुरात परतताच त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यात स्वर्गीय इंदिराजी यांनाही काही करता आले नाही. त्या निवडणुकीत निंबाळकर हे एक लाख सात हजार मतांनी विजयी झाले.

पुढे काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले. त्यातून १९७७ च्या निवडणुकीत निंबाळकर यांनी विद्यमान खासदार असूनही काँग्रेसचे तिकीट नाकारले. कारण त्यावेळची निवडणूक ही अटीतटीची होण्याची शक्यता होती. ऐनवेळी निंबाळकर यांनी तिकीट नाकारल्याने माने यांना संधी चालून आली. त्यातून त्यांची उमेदवारीही जाहीर झाली; पण अवघ्या १६५ मतांनी त्यांचा पराभव झाला. १९७७ च्या या निवडणुकीत कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाचे दाजिबा देसाई हे विजयी झाले.

आयुक्तपदी नियुक्ती करून सन्मान

१९७७ मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यांनी लोकसभेला पराभूत झालेल्या माने यांची नियुक्ती अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या आयुक्तपदी करून त्यांचा सन्मान केला. पूर्वी या विभागाचे आयुक्त सर्वेसर्वा होते. ते संविधानिक पद होते. आता त्यात समिती सदस्यांचा समावेश झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

"ती फक्त अंडी खाऊन जगत होती" परवीनच्या अखेरच्या दिवसाबाबत पूजा बेदीचा खुलासा; FBI ची भीती आणि एकटेपणा

Solapur Accident:'ट्रकच्या धडकेनंतर कार अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार'; सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील घटना

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

SCROLL FOR NEXT