Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana
Raju Shetti Swabhimani Shetkari Sanghatana esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : साखर कारखाने बंद पाडून राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं'; रघुनाथ पाटलांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जवान किसान पार्टीतर्फे कोल्हापूर, सांगली, बीड, कोल्हापूर, हातकणंगले, नंदूरबार या ठिकाणी नऊ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

कोल्हापूर : साखर कारखाने (Sugar Factory) बंद पाडून माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे नुकसान केले. ऊस अडवून आंदोलन करणे हे शहाणपणाचे नाही. आम्ही रस्त्यावर उतरत होतो, त्यावेळी कायदा आमच्या हातात होता. आता शेट्टी हे दहा द्या, पन्नास द्या म्हणून कारखानदारांकडे गयावया करत आंदोलन करतात. ही त्यांची पद्धत बरोबर नाही. शेट्टी खासदार असतानाच एफआरपीचा कायदा गेला आणि एसएमपीचा कायदा आला. उसाचा दर २५०० ते ३००० पर्यंतच आहे. हे शेट्टी यांचेच पाप असल्याची टीका रघुनाथदादा पाटील (Raghunath Dada Patil) यांनी केली.

लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातून (Hatkanangle Constituency) स्‍वतः आणि कोल्हापूर मतदारसंघातून बी. टी. पाटील हे भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचेही पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पाटील म्हणाले, ‘देशात भाजपची (BJP) अवस्था केविलवाणी आहे. महाराष्ट्रासह कोणतेही राज्य भाजपच्या ताब्यात नाही. जी आहेत, ती छोटी-छोटी राज्य आहेत. अशी अनेक राज्य आहेत जी भाजपला घेता आलेली नाहीत. आता मोदींची गॅरंटी म्हणून काहीही होणार नाही. ईडीचा वापर अति झाला आहे. लोकांना हे कळाले आहे. त्यामुळे त्यांचा ४०० पारचा आकडा लांबच राहील, बहुमतही मिळणार नसल्याचे चित्र आहे.’

राज्यात नऊ उमेदवार रिंगणात

भारतीय जवान किसान पार्टीतर्फे कोल्हापूर, सांगली, बीड, कोल्हापूर, हातकणंगले, नंदूरबार या ठिकाणी नऊ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये निवृत्त जवान आणि शेतकरी ही निवडणूक लढवत आहेत. उद्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बी. टी. पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT