Hasan Mushrif Shahu Chhatrapati Maharaj Loksabha Election Kolhapur esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : अजूनही वेळ गेलेली नाही, शाहू महाराजांनी अर्ज भरताना फेरविचार करावा; असं का म्हणाले मुश्रीफ?

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मी स्वतः निवडणुकीला उभे राहू नये, म्हणून विनंती केली होती.

सकाळ डिजिटल टीम

‘शाहू महाराजांवर (Shahu Chhatrapati Maharaj) टीका होत राहिली तर त्याचा आम्हाला देखील त्रास होईल.'

कोल्हापूर : ‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना मी स्वतः निवडणुकीला उभे राहू नये, म्हणून विनंती केली होती. राजकारण आले, निवडणूक आली की टीका होणार हे बोललो होतो. आम्हाला शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. उमेदवारी अर्ज भरायला वेळ असल्याने शाहू महाराज यांनी फेरविचार करावा, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मांडली.

भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘शाहू महाराजांवर टीका होत राहिली तर त्याचा आम्हाला देखील त्रास होईल. मात्र, संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्याविरोधात वैयक्तिक टीका करणारे व्हिडिओ यायला लागले, तेंव्हा त्याला उत्तरे दिली जाणार आणि वाद वाढणार, हे माहिती होते.

शाहू महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) लोकसभेचे उमेदवार म्हणून आता एका पक्षाचे झाले आहेत. त्यामुळे ते वादात ओढले जाणार, हे उघड होते’, असेही मुश्रीफ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT