Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Narayan Rane
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Narayan Rane esakal
लोकसभा २०२४

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री काळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक; राणेंची सडकून टीका

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री काळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक होता. त्यांच्या कंपनीत सगळेच चिटर आहेत.

मालवण : चारशेपेक्षा जास्त खासदार विजयी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्‌ट्रिक पूर्ण होणार आहे. यासोबत रत्नागिरी-सिंधुदुर्गचा (Ratnagiri-Sindhudurg) खासदार भाजप महायुतीच्या (Mahayuti) चारशे खासदारांपैकी एक असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राठीवडे येथे बोलताना व्यक्त केला. उद्धव ठाकरेंकडून भाजपवर होत असलेल्या टीकेला कृतीतून उत्तर देणार, असेही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री काळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक होता. त्यांच्या कंपनीत सगळेच चिटर आहेत. कोणतेही विकासकाम न करणाऱ्या येथील खासदाराचे डिपॉझिटही जनता जप्त करेल, असाही हल्लाबोलही त्यांनी केला. आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा मंत्री राणे यांच्या उपस्थितीत राठीवडे येथे झाला.

यावेळी भाजप नेते मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाजप नेते कुडाळ, मालवण विधानसभा प्रमुख नीलेश राणे, प्रांतिक सदस्य देवदत्त सामंत, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शोभा पांचाळ, माजी सभापती सीमा परुळेकर, बाळू कुबल, माजी उपसभापती राजू परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादा परब आदी उपस्थित होते.

यावेळी बाळू कुबल, डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रभाकर सावंत यांनी विचार मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव केला. १४० कोटी नागरिकांचा भारत २०४७ ला विकसित भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. देश विकसित होत असताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघ विकसित हवा. म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक विकासासाठी आपल्या हक्काचा खासदार हवा. राणे यांच्या नेतृत्वात हा मतदारसंघ विकसित करूया. केंद्राच्या सर्व योजना या मतदारसंघात तळागळापर्यंत पोहोचवूया, असे आवाहन भाजप नेते मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केले.

यावेळी ठाकरे यांच्यावरही शेलार यांनी टीका केली. तसेच राणे यांनी कोकणात केलेल्या विविध विकासकामे प्रकल्प यांची माहिती देतं राणे यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अजरामर असल्याचेही शेलार यांनी सांगत काँग्रेसने काश्मीरमध्ये वेगळा झेंडा, वेगळा कायदा केला. ३७० कलम निर्णयामुळे डॉ. बाबासाहेबांचा अपमान त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांचा इतिहास नागरिकशास्त्र याच्याशी संबंध नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणजे यू टर्न असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आता दूरदृष्टीचे खासदार हवेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजप युतीची सत्ता येणारच. भाजप चारशे पार होणार. यात आपले हक्काचे खासदार संसदेत हवेत. केंद्रीय मंत्री राणे यांच्या नेतृत्वात रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार भाजप महायुतीचे असणार. दूरदृष्टी असणारे खासदार आता हवेतच. कारण मागील दहा वर्षांत येथील खासदाराने काही केले नाही. व्यवस्था बदलणारे खासदार गरजेचे आहेत. आपल्या हक्काचे खासदार दिल्लीत असतील आणि मंत्रीही असतील, असा विश्वास भाजप नेते नीलेश राणे यांनी व्यक्त केला.

‘त्या’ स्टेटस्‌वरून राणेंकडून तेलींना कानपिचक्या

सावंतवाडी : मी पक्ष हित आणि युती धर्म बघतो. कोणाची नाराजी बघत नाही. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी चांगल्या कामात कोणीही अपशकुन करू नये, या मताचा मी आहे. त्यामुळे समोर भेटून बोलेन. मात्र, ‘रिक्वेस्ट’ माझ्या राशीत नाही, अशा कानपिचक्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माजी आमदार राजन तेली यांना दिल्या. तेली यांनी नाराजीचा स्टेटस्‌ ठेवल्याबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता ते बोलत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT