Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे? राणे विरुद्ध राऊत यांच्यात चुरशीची लढत

नीलेश राणे यांनी २००९ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी घेत विजय मिळवला.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेने विनायक राऊत यांच्या रुपाने नवीन चेहरा मैदानात उतरवला. त्या वेळी नीलेश राणे यांचा पराभव झाला.

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार विनायक राऊत अशी लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांनी मतदार संघात प्रचाराच्या फेऱ्यांवर फेऱ्या पूर्ण करणाऱ्यावर भर दिला आहे. युतीचा उमेदवार उशिरा जाहीर झाला आहे. त्यात या मतदार संघातील २ लाख ५५ हजार मुस्लिम मतदारांपर्यंत (Muslim Voters) पोहोचून त्यांना ‘आपलेसे’ करण्याचे आव्हान आहे.

ही मते निर्णायक ठरू शकतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सलग तिसऱ्यावेळी पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या विनायक राऊत आणि राणे यांच्यामध्ये लढत होत आहे. त्यामुळे मागील दोन पराभवांची परतफेड राणे करणार की, विनायक राऊत (Vinayak Raut) विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. नीलेश राणे यांनी २००९ मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी घेत विजय मिळवला.

त्या वेळी सुरेश प्रभू यांचा पराभव करून त्यांनी शिवसेनेची विजयी परंपरा खंडित केली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा काँग्रेसने उमेदवारी दिली, तर शिवसेनेने विनायक राऊत यांच्या रुपाने नवीन चेहरा मैदानात उतरवला. त्या वेळी नीलेश राणे यांचा पराभव झाला. २०१४ ला आलेल्या मोदी लाटेचाही नीलेश राणे यांना फटका बसला. २०१९ मध्ये पुन्हा नीलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले, तेव्हा विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली गेली.

त्या वेळी विनायक राऊत यांनी १ लाख ७० हजार मताधिक्याने नीलेश राणे यांचा पराभव केला. आता २०२४ च्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा राणे विरुद्ध राऊत असा सामना रंगणार आहे. मात्र, या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः नारायण राणे उभे ठाकल्यामुळे चुरस वाढली आहे. शिंदे गट व अजितदादा गट यांच्यामुळे राणे यांचा विजय सोपा होऊ शकतो. सध्या कागदावर तरी महायुतीची बाजू भक्कम दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT