Kolhapur Lok Sabha 2024 Esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत; दोन्ही मतदारसंघातून 'इतक्या' जणांनी घेतली माघार

काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आपली बंडखोरी कायम ठेवत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील लोकसभेच्या (Kolhapur Lok Sabha) दोन्ही मतदारसंघात काल नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर मतदारसंघातून चौघांनी, तर हातकणंगले मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतली. त्यामुळे कोल्हापुरात दुरंगी तर हातकणंगलेत चौरंगी लाढत होणार आहे.

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत काल (सोमवार) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. यावेळी कोल्हापूर मतदारसंघातून मालोजीराजे छत्रपती, वीरेंद्र मंडलिक, रूपा वायदंडे आणि राहुल लाड यांनी माघार घेतली. त्यामुळे या मतदारसंघात २३ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आपली बंडखोरी कायम ठेवत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. हातकणंगले मतदारसंघात अपक्ष उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने, वेदांतिका धैर्यशील माने, बाबासाहेब यशवंत पाटील, शिवाजी विठ्ठल माने आणि सुनील विलास अपराध यांनी माघार घेतली. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवार रिंगणात आहेत.

यामध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. याशिवाय भारत जवान किसान पक्षाचे रघुनाथदादा पाटीलही रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात उमेदवारांची निश्चिती झाल्याने आता प्रचारात रंगत येणार आहे. आतापर्यंत धूसर असणारे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, प्रमुख उमेदवारांवरून निवडणुकीतील लढत निश्चित झाली आहे.

उमेदवार आणि चिन्ह

कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (हाताचा पंजा), संजय मंडलिक (धनुष्यबाण), संजय मागाडे (हत्ती), संदीप कोगले (बॅट), बसगोंडा पाटील (भेटवस्तू), अरविंद माने (कॅरमबोर्ड), शशीभूषण देसाई (रोड रोलर), सुनील पाटील (गॅस सिलिंडर), संतोष बिसुरे (सीसीटीव्ही कॅमेरा), इरफान चांद (हिरवी मिरची), कुदरतुल्ला लतीफ (शिवणयंत्र), कृष्णा देसाई (हिरा), बाजीराव खाडे (ऊस शेतकरी), नागनाथ बेनके (शिट्टी), माधुरी जाधव (प्रेशर कुकर), मुश्ताक मुल्ला (दूरदर्शन), मंगेश पाटील (ईस्त्री), ॲड. यश हेगडे-पाटील (कोट), राजेंद्र कोळी (किटली), सलीम बागवान (अंगठी), सुभाष देसाई (लिफाफा), संदीप संकपाळ (बॅटरी टॉर्च)

हातकणंगले - रवींद्र कांबळे (हत्ती), धैर्यशील माने (धनुष्यबाण), सत्यजित पाटील आबा सरुडकर (मशाल), राजू शेट्टी (शिट्टी), डी. सी. पाटील (प्रेशर कुकर), इम्रान खतीब (खाट), डॉ. ईश्वर यमगर (ट्रिलर), दिनकरराव चव्हाण (सिंह), धनाजी गुरव (रिक्षा), रघुनाथदादा पाटील (भेटवस्तू), शरद पाटील (गॅस सिलिंडर), संतोष खोत (नारळाची बाग), अस्लम मुल्ला (चिमणी), आनंदराव सरनाईक (बॅटरी टॉर्च), जावेद मुजावर (फुगा), लक्ष्मण डवरी (अंगठी), लक्ष्मण तांदळे (हिरा), परशुराम माने (सफरचंद), मनोहर सातपुते (स्पॅनर), महंमद दरवेशी (एअर कंडिशनर), अरविंद माने (कॅरम बोर्ड), देवेंद्र मोहिते (ट्रक), राजेंद्र माने (दूरदर्शन), रामचंद्र साळुंखे (कपाट), शिवाजी संकपाळ (बॅट), सत्यजित पाटील (आबा) (माईक), आनंदराव थोरात (किटली).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT