Kolhapur Lok Sabha Bajirao Khade esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : शाहू महाराजांविरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बंडखोर नेते बाजीराव खाडे 6 वर्षांसाठी निलंबित

बाजीराव खाडे हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून लढण्यास इच्छुक होते.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाल्यानंतर पक्षाने याठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांना उमेदवारी दिली.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलेले काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांच्या बंडखोरीची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार खाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी हे आदेश काढले.

बाजीराव खाडे हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाकडून लढण्यास इच्छुक होते. त्याचाच एक भाग म्हणून गेली दोन वर्षांहून अधिक काळ त्यांनी मतदारसंघात संपर्क अभियान राबवले होते. कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाल्यानंतर पक्षाने याठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांना उमेदवारी दिली.

त्यातून नाराज झालेल्या खाडे यांनी अपक्ष अर्ज भरत बंडखोरी केली. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला, पण त्याला खाडे यांनी दाद दिली नाही. खाडे यांनी केलेल्या या बंडखोरीची गंभीर दखल घेत पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचे आदेश आज काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Virgo Horoscope : कन्या राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मेहनतीचे फळ मिळणार; करिअरमध्ये मोठी उलथापालथ, घरी पैसा येणार

Leo Horoscope : सिंह राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): या आठवड्यात भाग्य तुमच्या पायाशी; धनलाभ योग, स्पर्धा परीक्षेत यश मिळणार

Cancer Horoscope : कर्क राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): सुरुवात कठीण, पण शेवट गाजणार; धनलाभ होईल अन् कामाच्या ठिकाणी मोठी कलाटणी

Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

SCROLL FOR NEXT