Kolhapur Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Kolhapur Lok Sabha : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला, उमेदवारी मागं घेण्यास कुणी भाग पाडलं? सामंत आज करणार पर्दाफाश

छत्रपतींच्या गादीचा अपमान कुणी केला, संभाजीराजेंवर (Sambhaji Raje) कसा दबाव टाकण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीराजे यांना तिकीट न देऊन कुणी खऱ्या अर्थाने गादीचा अपमान केला. त्यांच्याकडून कसे अॅग्रीमेंट करून घेण्यात आले.

कोल्हापूर : ‘छत्रपतींच्या गादीचा अपमान कुणी केला, संभाजीराजेंवर (Sambhaji Raje) कसा दबाव टाकण्यात आला. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास कुणी भाग पाडले, या सर्वांचा एक मे रोजी कोल्हापुरात पर्दाफाश करणार असल्याचा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिला. त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्याविरोधात महायुतीने उमेदवार देऊन छत्रपतींच्या गादीचा अपमान केला असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून प्रचारात सातत्याने केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सामंत यांनी संबंधित बाबींचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे.

या निवडणुकीमध्ये अनेकांची विनोदबुद्धी फार जागृती झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांना तिकीट न देऊन कुणी खऱ्या अर्थाने गादीचा अपमान केला. त्यांच्याकडून कसे अॅग्रीमेंट करून घेण्यात आले. त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला.

उमेदवारी मागे घेताना संभाजीराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारंवार सांगत होते की, एका मंत्र्यांचा फोन आला होता. तो मंत्री मीच होतो. माझ्या बंगल्यावर त्यांच्याकडून कशा पद्धतीने अॅफिडेव्हिट लिहून घेण्यात आले. त्यांना कशी उमेदवारी मागे घ्यायला लावली या सर्व बाबींचा पर्दाफाश लाव रे तो व्हिडिओ अशा पद्धतीने करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात खळबळ! राज्याचे माजी मंत्री अन् प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

MP Supriya Sule : विलीनीकरणाबाबत माझी अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती

Jharkhand Elephant Attack : हत्तींच्या कळपाने एकाच कुटुंबातील ६ जणांना तुडवून केले ठार, लोक गाव सोडून पळाले; परिसरात भीतीचे वातावरण

Akola Gas Cylinder Blast: मायलेकासह आठ वर्षीय भाचीचा मृत्यू; अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रूक येथे अग्नीतांडव

SCROLL FOR NEXT