Kolhapur Lok Sabha Dhananjay Mahadik vs Satej Patil esakal
लोकसभा २०२४

महादेवराव महाडिकांचा मानसपुत्र म्हणून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि त्यांच्याच विरोधात..; काय म्हणाले धनंजय महाडिक?

‘दुसऱ्याचा चेहरा इतका काळा करायचा की शेजारचा गोरा वाटला पाहिजे, अशी त्यांची पद्धत आहे.'

सकाळ डिजिटल टीम

माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा मानसपुत्र म्हणून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. कारण त्यांना दिवंगत दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करायचा होता.

कोल्हापूर : ‘एखादा राजकारणी जोपर्यंत आपल्यासोबत आहे, तोपर्यंत तो चांगला; पण बाजूला गेला की त्याचे चारित्र्यहनन करणे ही सतेज पाटील (Satej Patil) यांची पद्धत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी माध्यमांशी बोलताना केली.

महाडिक म्हणाले, ‘उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पाटील यांचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यासोबत अनेक कार्यक्रम सुरू होते; पण आता त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी अप्‌प्रचार सुरू केला आहे. प्रा. मंडलिक यांना ते आता कृतघ्न म्हणत आहेत. ३२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांचे उद्‌घाटन त्यांनी मंडलिक यांच्यासोबत केले. त्यावेळी प्रा. मंडलिक हे कार्यक्षम होते आणि आता ते महायुतीचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर कृतघ्न कसे झाले आहेत?’

महाडिक पुढे म्हणाले, ‘दुसऱ्याचा चेहरा इतका काळा करायचा की शेजारचा गोरा वाटला पाहिजे, अशी त्यांची पद्धत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा मानसपुत्र म्हणून त्यांनी राजकारणात सुरुवात केली. कारण त्यांना दिवंगत दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करायचा होता. त्यानंतर ते महाडिक यांच्या विरोधातच उभे राहिले. जिल्ह्यातल्या सत्ता त्यांना हातात घ्यायच्या होत्या आणि विरोधात कोणी गेले तर त्यांच्या विरोधात राहायचे ही त्यांची पद्धत आहे.

या निवडणुकीतही त्यांचा स्वार्थ पाहायला मिळतोय. विधान परिषदेच्या वेळी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांना मध्यस्थी करून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्द दिला की ‘राजाराम’ची निवडणूक लढवणार नाही; पण निकालानंतर त्यांनी ‘राजाराम’मध्ये पॅनेल केले.

मुश्रीफ यांचे पद हिसकावले

२०१९ साली महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री पदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना संधी होती. कारण, मुश्रीफ पाच वेळा आमदार झालेले आहेत. मात्र, मुश्रीफ यांना वेगळ्या जिल्ह्यात पाठवले आणि पाटील यांनी दिल्लीपर्यंत जाऊन मुश्रीफांची इथली संधी हिसकावून घेत स्वतः पालकमंत्री पद घेतल्याचे महाडिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election: पुण्यात एकाच वार्डात शिवसेनेचे दोन AB फॉर्म! एका उमेदवाराने हातातून हिसकावला… फाडला… अन् गिळला! नेमकं काय घडलं?

Pune Municipal Election : आघाडीत बिघाडी, तर युतीत कुस्ती; खिरापतीसारखे एबी फॉर्म वाटल्याने पक्षांमध्ये अडचणी

Solapur News: द्राक्षबागायतदार संघ आक्रमक! पाच हजार टन बेदाणा भारतात आल्याचा संशय, सांगलीत चौकशी सुरू, अन्यथा आंदोलनाची तयारी!

केंद्र सरकारकडून नववर्षाची भेट! नाशिक-सोलापूरदरम्यान ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’; केंद्राकडून १९ हजार कोटींचा निधी!

Gopichand Padalkar : 'मराठी-कन्नड या दोन्ही भाषा माझ्यासाठी समान'; टीईटी परीक्षेबाबतही आमदार गोपीचंद पडळकरांचं महत्त्वाचं विधान

SCROLL FOR NEXT