UP Lok Sabha 2024 eSakal
लोकसभा २०२४

लक्षवेधी लढत : यूपीच्या अमरोहामध्ये रंगतदार तिरंगी मुकाबला

Lok Sabha 2024 : काँग्रेस-समाजवादी पक्षाचा संयुक्त उमेदवार, बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार असा त्रिकोणी मुकाबला असल्याने अमरोहामध्ये भाजपला २०१४ च्या निकालांच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे.

सकाळ वृत्तसेवा

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील मानले जाणारे नंतर बहुजन समाज पक्षाचे खासदार बनलेले आणि आता काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढविणारे कुंवर दानिश अली, त्यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसलेला बहुजन समाज पक्ष आणि २०१४ मधील विजयाच्या पुनरावृत्तीची आस बाळगून असलेल्या भारतीय जनता पक्षाचे कंवरसिंह तंवर यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातली तिरंगी लढत लक्षवेधी बनली आहे.

या मतदारसंघात झालेल्या १७ निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी धक्कादायक निकाल लागले असून काँग्रेसला तब्बल ४० वर्षे आणि समाजवादी पक्षाला २८ वर्षांपासून येथे विजय मिळवता आलेला नाही. विशेष म्हणजे दोनदा अपक्षांनीही संसदेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यापार्श्वभूमीवर विजयाचा हा दुष्काळ दानिश अली यांच्या निमित्ताने संपावा, या प्रयत्नात काँग्रेस पक्ष आहे. तर दानिश अली यांना धडा शिकविण्याच्या जिद्दीने बहुजन समाज पक्षाने डॉ. मुजाहिद हुसेन यांच्या रूपाने अल्पसंख्याक उमेदवार मैदानात उतरविला.

या दोन अल्पसंख्याक उमेदवारांच्या लढतीत भाजपने अमरोहमध्ये २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळविणारे कंवरसिंह तंवर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये कंवरसिंह तंवर यांनी अमरोहा जिंकले होते. त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या हुमेरा अख्तर यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे उमेदवार फरहान हसन यांनी १.६२ लाख मते घेतली होती. २०१९ मध्ये मात्र, भाजपचे कंवरसिंह तंवर यांना त्यांना बहुजन समाज पक्षाचे कुंवर दानिश अली यांच्याकडून ६३ हजाराहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला होता. अर्थात, त्यावेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने ही जागा काँग्रेसला सोडली आहे. साहजिकच काँग्रेस-समाजवादी पक्षाचा संयुक्त उमेदवार, बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार असा त्रिकोणी मुकाबला असल्याने अमरोहामध्ये भाजपला २०१४ च्या निकालांच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. अर्थात, अमरोहामध्ये या तीन उमेदवारांसह १२ उमेदवार मैदानात असून त्यात त्यात आठ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

जातीचे समीकरण

दलित, जाट, गुज्जर, सैनी आणि विशेषतः मुस्लिम मतांचा लक्षणीय प्रभाव असलेल्या अमरोहा लोकसभा मतदारसंघात अमरोहा, हसनपूर, धनौरा, नौगवान सदात आणि गढमुक्तेश्वर हे विधानसभा आहेत. यातील अमरोहा व नौगवान सादात हे मतदारसंघ मुस्लिमबहुल असून तेथे ‘सप’चे आमदार आहेत. तर तर अनुसूचित जातीसाठी राखीव धनौरासह उर्वरित तिन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT