UP CM Yogi Adityanath
UP CM Yogi Adityanath esakal
लोकसभा २०२४

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

सकाळ डिजिटल टीम

जगाला शांतता आणि समृद्धीचा संदेश देणारी सनातन परंपरा आपली विरासत आहे. या सनातन परंपरेने संपूर्ण भारताला जोडले आहे.

इचलकरंजी, सांगली : ‘‘काँग्रेसने (Congress) अयोध्येत श्री रामाचे, मथुरेत श्री कृष्णाचे आणि वाराणसीत काशिविश्वेश्वराचे अस्तित्व नाकारले. त्यांनी देशातील सनातन परंपरेचा नेहमीच अपमान केला. मतांच्या राजकारणासाठी गो हत्येचे समर्थन केले. हिंदू आतंकवाद अशी खोटी संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न केला, अशा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी असलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मत देणे हे महापाप आहे,’’ अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली.

‘शिवसेनेचे धनुष्यबाण दिल्लीत पाठवण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.’ इचलकरंजी येथील थोरात चौकातील खवरे मार्केट येथे झालेल्या महागर्जना सभेमध्ये ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही सभा घेतली.

यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘जगाला शांतता आणि समृद्धीचा संदेश देणारी सनातन परंपरा आपली विरासत आहे. या सनातन परंपरेने संपूर्ण भारताला जोडले आहे. त्यामुळेच राममंदिराचा लोकार्पण सोहळा अयोध्येत झाला. त्या दिवशी महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिराचे स्वप्न अयोध्येत पूर्ण झाले. कॉंग्रेसने हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या गायीच्या कत्तलीचे समर्थन केले. काँग्रेसने केवळ स्वप्ने दाखवली, पण पंतप्रधान मोदी यांनी ती सत्यात उतरवली. इंदिरा गांधी यांनी ‘’गरिबी हटाव’चा नारा दिला. त्यांचे नातू राहुल गांधीही गरिबी हटाव असेच अद्यापही म्हणत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खाती उघडली. आता अनुदानाची, योजनांची रक्कम थेट खात्यात जमा होते. त्यामुळे एजंटगिरी संपली. देशामध्ये महामार्ग, विमानतळ, रेल्वे अशा पायाभूत सुविधांचा गतीने विकास झाला आहे. आता आपल्यावर दहशतवादी हल्ले होत नाहीत. कारण नवा भारत हल्ले सहन करत नाही, तर घरात घुसून उत्तर देतो. काश्मीरचे ३७० कलम मोदींनी हटवले. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले. मोदी जे बोलतात ते करतात, म्हणूनच त्यांना लोक निवडून देतात. त्यामुळेच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देऊन रामाच्या हातातील धनुष्यबाण दिल्लीमध्ये पाठवा.’’

सभेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव घोरपडे, सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, अनिल बोंडे, उमेदवार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस झिजिया कर लावणार

काँग्रेस सत्तेत आली तर वारसा कर लावणार आहे. हा एक प्रकारचा झिजिया कर असून, देश तो कधीच स्वीकारणार नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: अर्ज दाखल करण्यासाठी सुनेत्रा पवार विधानभवनात दाखल; केंद्रात मंत्रिपद मिळणार का? राष्ट्रवादीची खेळी नेमकी काय?

IPL Valuation: अरे बाप रे...! आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू तब्बल 16.4 अब्ज डॉलरवर; मुंबई, RCB नाही तर 'ही' टीम नंबर वन

Hamare Baarah: सौंदर्यामुळे अनेकवेळा झाली रिजेक्ट, पहिल्याच चित्रपटामुळे येतायत बलात्काराच्या धमक्या; अभिनेत्रीनं सांगितले धक्कादायक अनुभव

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभेला 'एकला चलो रे'चा नारा; २५० उमेदवार उभे करण्याची तयारी?

T20 World Cup 2024 Pakistan : पाकिस्तानसमोर आता नवे संकट; अमेरिकेतून 'तो' व्हिडिओ व्हायरल, वर्ल्ड कपमधून जाणार बाहेर?

SCROLL FOR NEXT