Uttar Mumbai Lok Sabha 2024 eSakal
लोकसभा २०२४

Uttar Mumbai Lok Sabha 2024 : भाजपचा एकदिलाने प्रचार, मात्र काँग्रेसचा उमेदवारही नक्की नाही

गुजराती भाषिकांचा भाजपला असलेला मोठा पाठिंबा, तसेच येथे मोठ्या संख्येने असलेला झोपडपट्ट्यांमधील उत्तर भारतीय समाज देखील योगींमुळे भाजपच्या बाजूने आहे.

सकाळ वृत्तसेवा

Uttar Mumbai Lok Sabha 2024 : उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची उमेदवारी जाहीर केली. खासदार गोपाळ शेट्टी यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. पण गाेयल यांना मिळणारा पाठिंबा पाहता शिवसेना-भाजप युती एकदिलाने प्रचार करणार हे निश्चित आहे. मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. मतदारसंघातील परंपरागत मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांची मोठी संख्या व त्यातही गुजराती भाषिकांचा भाजपला असलेला मोठा पाठिंबा तसेच येथे मोठ्या संख्येने असलेला झोपडपट्ट्यांमधील उत्तर भारतीय समाज देखील योगींमुळे भाजपच्या बाजूने आहे.

2019 चे चित्र

गोपाळ शेट्टी (भाजप) विजयी, मते : ७,०६,६७८

उर्मिला मातोंडकर (काँग्रेस), मते : २,४१,४३१

सुनील थोरात (वंचित बहुजन आघाडी), मते : १५,६९१

वर्चस्व

२००४ : काँग्रेस

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

  • मतदारसंघात भाजपचे वर्चस्व, गोपाळ शेट्टी यांनी सलग दोनदा, तर भाजपचे राम नाईक यांनी सलग पाचव्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

  • उमेदवार जाहीर करून भाजपची आघाडी

  • पीयूष गोयल यांच्याकडून प्रचाराला सुरुवात

  • शिवसेना शिंदे गट भाजपच्या बाजूने

  • काँग्रेसकडून उमेदवाराची अजूनही चर्चा नाही

हे मुद्दे प्रभावी ठरणार

  • मराठा आरक्षण व अन्य प्रश्नांचा फारसा प्रभाव नाही.

  • मुंबईच्या इतर मतदारसंघाप्रमाणेच वाहतुकीचा प्रश्न इथेही गंभीर.

  • झोपडपट्ट्या व जुन्या चाळींचा प्रश्न वर्षनुवर्षे खरडला आहे.

  • संरक्षणखात्याच्या जागेचा प्रश्न मोठा आहे.

  • या खात्याच्या अधिकारात अनेक जमिनी येत नाही. त्यामुळे पुनर्वसन करता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT