Vijay Shivtare  sakal
लोकसभा २०२४

Vijay Shivtare : शिवतारेंचे बंड, सपशेल थंड ; पवारांविरोधी लढाईमधून माघार घेतल्याची पत्रकार परिषदेत घोषणा

पवार कुटुंबाच्या विरोधातील लढाईला माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पूर्णविराम दिला असून, नरेंद्र मोदीसाहेब हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, तसेच राज्यात महायुतीचे सरकार यावे म्हणून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले

सकाळ वृत्तसेवा

सासवड शहर : पवार कुटुंबाच्या विरोधातील लढाईला माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पूर्णविराम दिला असून, नरेंद्र मोदीसाहेब हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत, तसेच राज्यात महायुतीचे सरकार यावे म्हणून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत दिलासा मिळाला आहे.

सासवड (ता. पुरंदर) येथे शिवतारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून उभे राहण्याची मी निश्चित पूर्ण तयारी केली होती. परंतु माझ्या उमेदवारीमुळे महायुतीच्या १० ते १२ जागा धोक्यात येत होत्या. तसेच, मुख्यमंत्री अडचणीत येत आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवाराला ५० हजारांचे अधिकचे मताधिक्य देऊ. सुनेत्रा पवार यांच्या घड्याळ चिन्हाचा प्रचार केला जाईल.’’

शिवतारे म्हणाले, ‘‘पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या पाण्याचा प्रश्न दोन महिन्यांत सोडविण्याबरोबरच भोरमधील वाजेघर, वांगणे, शिवगंगा या खोऱ्यातील योजनेसाठी १७८२ कोटी रुपयांची सुधारित प्रकल्प मान्यता आचारसंहितेनंतर मिळणार आहे. त्याचबरोबर विमानतळ, राष्ट्रीय बाजार, पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी ५८ कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली. दोन वर्षात पाणी आलं पाहिजे, हे तिघांनीही मान्य केले आहे. विमानतळासाठी स्वेच्छा खरेदी रेट जाहीर करा. पैशाची सरकारने तरतूद करावी. शेतकरी यांच्यावर स्वेच्छा जमिनी दिल्या तर घ्याव्यात. आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, अशी मागणी केली आहे.’’

यावेळी हरिभाऊ लोळे, दिलीप यादव, रमेश इंगळे, श्रीकांत टिळेकर, धीरज जगताप, ममता शिवतारे- लांडे, विद्या टिळेकर, अस्मिता रणपिसे, तुषार हंबीर, नितीन कुंजीर, राजू झेंडे, रमेश भाडळे, सागर मोकाशी, अंकुर शिवरकर, मिलिंद इनामके, मंगेश भिंताडे, अनिकेत जगताप, भानुदास मोडक, अक्षय पिंजन, अण्णा काळे, निखिल हेंद्रे, स्वप्नील गायकवाड आदी उपस्थित होते.

‘अजित पवारांना पूर्वीच माफ केले’

‘‘पवार विरोधी असणाऱ्या ५ लाख ५० हजार मतांसाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठका घेऊन ते मतदान पॉझिटिव्ह कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. पूर्वी दोन्ही पवार विरोधात होते, आता एक पवार युतीमध्ये आहेत. मी यापूर्वीच अजित पवारांना माफ केले असून, त्यांनी आता माफी मागण्याची गरज नाही. कदाचित पुढच्या लोकसभेला माझा विचार होऊ शकतो,’’ असे शिवतारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT