Vishwajeet Kadam Esakal
लोकसभा २०२४

Sangali Loksabha: सांगलीत विशाल पाटील एकाकी? मित्रपक्षांना इशारा देत विश्वजीत कदमांचा आघाडीचे काम करण्याचा निर्णय

Vishwajeet Kadam: 2014 पासून आपला पक्ष सत्तेत नाही. तेव्हापासून सांगली काँग्रेसवर अनेक संकटे आली. या काळात आमच्यावर विरोधी पक्षाबरोबर कधीकधी मित्रपक्षांचेही आक्रमण झाले.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांच्या रुपाने बंडखोरी झाल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला (यूबीटी) सुटल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांना आवरणे काँग्रेससाठी जड जात आहे.

याशिवाय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मन वळवत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करावे यासाठी काँग्रेसने आज सांगलीत मेळावा आयोजित केला होता.

यावेळी आमदार विश्वजीत कदम यांनी, पक्षाची अडचण होत असेल तर कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे असे सूचक विधान केल्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आता एकाकी झुंझ द्यावी लागणार हे नक्की झाले.

यावेळी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या कार्याकर्त्यांना आदेश देत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे काम करण्याचे आदेश दिले.

यावेळी सांगलीमध्ये विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावू म्हणून विश्वजीत कदम यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण यामध्ये त्यांना यश आले नाही. यावेळी कदम म्हणाले, ज्या ज्या वेळी आपला नेता, पक्ष आणि विचारधारेची अडचण होत असेल तर कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे.

ते पुढे म्हणाले, 2014 पासून आपला पक्ष सत्तेत नाही. या काळात सांगली काँग्रेसवर अनेक संकटे आली. या काळात आमच्यावर विरोधी पक्षाबरोबर कधीकधी मित्रपक्षांचेही आक्रमण झाले. पण लक्षात ठेवा आम्ही सर्व तरुण लोक खंबीरपणे

यावेळी विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले ही जागा मूळची काँग्रेसची असताना भलतेच घडले. या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. परिस्थिती काँग्रेसच्या बाजूने असताना उद्धव ठाकरे यांनी अचानक चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. हे चुकीचे होते.

कदम यांनी सांगितले की, मी विशाल पाटील यांना समजावून सांगितले पण त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. मी काँग्रेस उमेदवारासाठी प्रयत्न करत होतो. पण आता मला महाविकास आघाडीचा धर्म पाळावा लागणार आहे.

पुढे कदम यांनी, खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. व यावेळी झालेली चूक विधानसभेला होऊ देणार नसल्याचे सांगितले.

कदम म्हणाले, या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील आणि त्यामुळे पुन्हा विधानसभेला त्यांना आवाज करू नये.

गेल्या तीन-चार महिन्यांच्या सापशिडीच्या खेळात आम्हाला साप चावला पण अंतिम विजय आमचाच होईल असे, कदम म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना आमदार विश्वजीत कदम यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावरही जोरदार निशाना साधला. कदम म्हणाले, भाजपने 2014 पासून जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी पहिल्यांदा सत्ता मिळवण्यासाठी जनतेची फसवणू केली आणि स्वार्थ साधण्याचे काम केले. 2014 पासून आतापर्यंत नोटबंदी, जीएसटी, अन्यायकारक कृषी कायदे करत लोकांना भाजपने फसवलं.

आज भाजप सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील लोकशाही संपण्याचे करत आहे. प्रामुख्याने गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी अनेक कटकारस्थाने करत विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला, असा घाणाघातही विश्वजीत कदम यांनी मेळाव्यात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT