Sangli loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Sangli loksabha Constituency : सांगलीवरून खडाखडी सुरूच ; संजय राऊत यांच्या टीकेनंतर काँग्रेसचा सबुरीचा सल्ला

‘‘विशाल पाटील यांचे एक भाषण मला आज सकाळी शिवसैनिकांनी ऐकायला दिले. त्यात विशाल म्हणत आहेत की विश्वजित कदम हे माझे पायलट आहेत, पण मी सांगतो त्या पायलटचे विमान गुजरातच्या दिशेला जाऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : ‘‘विशाल पाटील यांचे एक भाषण मला आज सकाळी शिवसैनिकांनी ऐकायला दिले. त्यात विशाल म्हणत आहेत की विश्वजित कदम हे माझे पायलट आहेत, पण मी सांगतो त्या पायलटचे विमान गुजरातच्या दिशेला जाऊ शकते. आम्ही त्या पायलटशी चर्चा करू. त्याला ट्रेनिंग देऊ,’’ अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पहिल्यांदाच थेट काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्यावर हल्ला चढविला.

तासगाव येथे काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करताना त्यांनी ‘ही नौटंकी आता थांबवा’ अशा शब्दांत फैलावर घेतले. याच मुद्द्यावरून काँग्रेसनेही राऊत यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी आज ठिकठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सांगलीत कोणीतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपला फायदा करून देतेय का? असा संशय व्यक्त करणाऱ्या राऊत यांनी आज थेट विश्‍वजित यांचा नामोल्लेख करीत लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘‘विश्वजित आणि विशाल पाटील दिल्लीत गेल्याचे आम्हाला समजले. काल रात्री त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली आहे.

त्याची काळजी करण्याचे कारण नाही. विशाल पाटील यांचे भाषण काल मी ऐकले. त्यात त्यांनी त्यांचे पायलट जिथे विमान उतरवतील तिथे मी जाईन असे सांगितले होते. त्यांच्या पायलटशीच आम्ही आता चर्चा करू. जिल्ह्यातील खासदार हा निष्क्रिय असल्याबाबत सगळ्यांचे एकमत झाले आहे. भाजपचा खासदार पराभूत करायचा असेल तर एकास एकच लढत झाली पाहिजे असे काही स्थानिक नेत्यांचे मत आहे. त्यासाठी ठाकरे गटाला सर्वांनी एकत्रित ताकद दिली तर नक्कीच विजय होईल.’’

शरद पवार यांच्यावर बोलणे टाळले

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा आघाडीतील सहयोगी पक्षांना न विचारता जाहीर केली गेली असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याबद्दलच्या प्रश्नाला राऊत यांनी उत्तर देणे टाळले. ते म्हणाले,

‘‘मला पवारांबाबत काही बोलायचे नाही; परंतु भिवंडीची जागा मित्रपक्षांना विचारात न घेता जाहीर केली गेल्याचे काँग्रेसचे मत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT