Loksabha Election sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election : मतदानाचा टक्का वाढणार का? ; चौथ्या टप्प्यात ९६ मतदारसंघांमध्ये आज मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत असून दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ९६ जागांवर मतदानप्रक्रिया पार पडेल. या ९६ पैकी ११ मतदारसंघ महाराष्ट्रातील आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत असून दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील ९६ जागांवर मतदानप्रक्रिया पार पडेल. या ९६ पैकी ११ मतदारसंघ महाराष्ट्रातील आहेत. चौथ्या टप्प्यात एकूण १,७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे मतदान पार पडल्यानंतर आतापर्यंत एकूण ३७९ लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची सांगता होणार आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत काहीसा घसरल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर उद्याच्या (सोमवार) मतदानाकडे लक्ष असेल.

तेलंगणमध्ये यावेळी अनेक मतदारसंघांत ‘हाय व्होल्टेज’ लढती पाहायला मिळणार आहेत. हैदराबादमध्ये ‘एमआयएम’चे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा सामना भाजपच्या फायरब्रॅंड नेत्या माधवी लता यांच्याशी होत आहे. सिकंदराबादमध्ये भाजपचे विद्यमान खासदार जी. किशन रेड्डी यांची लढत बीआरएसच्या टी. पद्मा राव आणि काँग्रेसच्या डी. नागेंदर यांच्याशी होत आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज मतदारसंघातील लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे

याठिकाणी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचा मुकाबला भाजपच्या सुब्रत पाठक यांच्याशी होत आहे. लखीमपूर खिरी मतदारसंघात भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांची लढत ‘सप’च्या उत्कर्ष वर्मा यांच्याशी होणार आहे. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी आमनेसामने आहेत.

याशिवाय, महुआ मोईत्रा (तृणमूल काँग्रेस), अधीररंजन चौधरी (काँग्रेस), युसूफ पठाण (तृणमूल काँग्रेस), एस. एस. अहलुवालिया (भाजप), शत्रुघ्न सिन्हा (तृणमूल काँग्रेस), गिरीराज सिंह (भाजप) या नेत्यांचे भवितव्य सोमवारी मतदानयंत्रात बंद होणार आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने

मतदार जनजागृतीचे बरेच उपक्रम हाती घेतले होते. त्याचा परिणाम म्हणून उद्या मतदानाचा

टक्का वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यातील प्रमुख उमेदवार

नंदुरबार : हीना गावित (भाजप),

जळगाव : स्मिता वाघ (भाजप),

रावेर : रक्षा खडसे (भाजप), श्रीराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

जालना : रावसाहेब दानवे (भाजप), डॉ. कल्याण काळे (काँग्रेस)

औरंगाबाद : इम्तियाज जलील (एमआयएम), संदीपान भुमरे (शिवसेना), चंद्रकांत खैरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मावळ : श्रीरंग बारणे (शिवसेना), संजोग वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिरूर : अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे : मुरलीधर मोहोळ (भाजप), रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

अहमदनगर : सुजय विखे (भाजप), निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

शिर्डी : सदाशिव लोखंडे (शिवसेना), भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

बीड : पंकजा मुंडे (भाजप), बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)

  • आंध्र प्रदेश २५

  • तेलंगण १७

  • उत्तर प्रदेश १३

  • महाराष्ट्र ११

  • प. बंगाल ८

  • मध्य प्रदेश ८

  • बिहार ५

  • ओडिशा ४

  • झारखंड ४

  • जम्मू-काश्‍मीर १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT