Mamata Banerjee sakal
लोकसभा २०२४

Mamata Banerjee : मी स्वतः शिजवलेले अन्न मोदींनी खावे ; ममता बॅनर्जी यांचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील मांसाहारी लोकांवर केलेल्या टीकेची खिल्ली पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी उडवली.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील मांसाहारी लोकांवर केलेल्या टीकेची खिल्ली पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी उडवली. स्वतः शिजवलेले अन्न खाण्याचे निमंत्रण मोदी यांना देत भारतातील वैविध्यपूर्ण आहार पद्धती संपविण्याच्या प्रयत्न भगवेधारी परिसंस्था करीत असल्याची टीका बॅनर्जी यांनी केली.

बराकपूरच्या सभेत त्या म्हणाल्या, ‘‘आता मोदी असे सांगत आहेत, की मासे खाऊ नका, अंडी खाऊ नका किंवा मटण खाऊ नका. मग ते मशरूम किंवा बार्ली खातील का? त्यांना सांगा याची व्यवस्था करा.’’

जेथे बहुतांश लोक मांसाहारी किंवा मच्छीप्रेमी आहेत, मग ते कोणत्याही धर्माचा असले तरी त्यांना जे आवडते ते खायचे स्वातंत्र असायला हवे. हा देश आपल्या सर्वांचा आहे. विविधतेत एकता आहे. कोणाला ढोकळा आवडत असेल तर कोणाला डोसा, कोणाला इडली आवडत असेल किंवा कोणाला पराठे, कोणाला बिर्याणी पसंत असेल तर कोणाला झिंगा-चिंगरी, असे त्यांनी म्हणताच सभेला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

ममता म्हणाल्या, ‘‘ मोदीबाबू! तुम्ही काही पदार्थांचा स्वाद का घेत नाहीत. तुम्ही चव घेणार का? मी तुमच्यासाठी स्वयंपाक करीन. तुम्ही मला काही खाण्यास सांगा, मी आनंदाने खाईन. जाती, धर्म, समाजाच्या आधारावर विभाजन मान्य नाही. लोकांसाठी न्याय हाच सर्वांत मोठा सन्मान, बाकी काही नाही,’’ अशा शब्दांत ममता यांनी मोदींची खिल्ली उडविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT