Why did Supriya Sule reach Ajit Pawar residence on polling day esakal
लोकसभा २०२४

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Baramati lok sabha: तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. शरद पवार यांचे मुळ गाव असलेल्या काटेवाडीत आज सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन काकींची भेट घेतली.

Sandip Kapde

Baramati lok sabha:

बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. काटेवाडीतील मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या. यावेळी अजितदादांच्या आईचे आशिर्वाद घेण्यासाठी गेल्याचे सुळे यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे यावेळी अजित पवार देखील घरी उपस्थित होते. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काय दडलं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आज बारामती मतदारसंघात मतदान पार पडत आहे. या लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात लढत आहे. हे दोन्ही गट प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करत होते.

आज सकाळी पवार कुटुंबातील सदस्यांनी विविध मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व राजकीय धामधूम सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या घरी गेल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी ५ मिनिटे अजित पवार यांच्या आईची भेट घेतली. आशाकाकी यांना नमस्कार करायला मी आले होते. आशाताई मतदान करायला आल्या होत्या. त्यामुळे त्यांना भेटले. मी नेहमीच आशिर्वाद घेण्यासाठी येत असते. हे माझ्या काका काकींचे घर आहे. माझं सगळं लहानपण इथं गेलय. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मी इथं राहायचे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मतदान सुरु आहे, त्यामुळे आता राजकीय कुटुता संपवण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या असतील. हे राजकारणातील चांगल उदाहरण आहे. हे सर्व पक्षांनी लक्षात घेतलं पाहीजे, असे राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT