writers dont die just their books not published ruskin bond interview  Sakal
लोकसभा २०२४

लेखक मरत नाहीत,‘आउट ऑफ प्रिंट’ होतात; 'रस्कीन बाँड' मुलाखतीत दिलखुलास गप्पा

‘जुने लेखक कधी मरत नाहीत, फक्त त्यांची पुस्तके छापली जात नाहीत’, असे ते हसत हसत सांगतात.

सकाळ वृत्तसेवा

लँडोर (उत्तराखंड) : वाचनाची आवड असणाऱ्यांना रस्कीन बाँड हे नाव कदाचित माहिती असेल. ‘द रुम ऑन द रुफ’, ‘अ फ्लाइट ऑफ अ पिजन्स’, ‘अँग्री रिव्हर’, ‘ब्लू अम्ब्रेला’ या आणि अशा अनेक पुस्तकांच्या माध्यमातून कथा सांगत खिळवून ठेवणारे रस्कीन बाँड आज ९० वर्षांचे झाले.

‘जुने लेखक कधी मरत नाहीत, फक्त त्यांची पुस्तके छापली जात नाहीत’, असे ते हसत हसत सांगतात. ब्रिटिशकालात पंजाबमधील कसौली येथे जन्मलेल्या रस्कीन बाँड यांचे आयुष्य मसूरी येथे गेले आहे. आताही ते मसूरीमधील लँडोर या अत्यंत निसर्गरम्य गावात आपल्या दत्तक कुटुंबासह राहतात.

वयामुळे हालचाल मंदावली असली तरी त्याचा उत्साहावर परिणाम झालेला नाही. ‘नव्याण्णव टक्के लेखक काही वर्षांनंतर विस्मृतीत जातात. आम्ही भावी पिढ्यांसाठी लिहितो, प्रत्यक्षात काही वर्षांतच लोकांना त्याचा विसर पडतो.

माझी पुस्तके वाचून कोणाला आनंद वाटत असेल, तर समाधान आहे. लेखकांना स्वत:हून लोकांपासून दूर जाणे फारच सोपे आहे -आपली पुस्तकेच छापून आणायची नाहीत,’ असे रस्कीन बाँड यांनी नव्वदीनिमित्त ‘पीटीआय’ने त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.

वय झाले असले तरी रस्कीन बाँड समाधानी आहेत. कदाचित निसर्गात राहिल्याचा परिणाम असावा. ‘मी आनंदी आणि समाधानी आयुष्य जगत आहे. मला आवडते ते करताना मी फारसा विचार करत नाही,’ असे ते सांगतात.

वाचनाची आवड कायम

वयाची नव्वदी आली तरी अद्यापही रस्कीन बाँड यांची वाचनाची आवड टिकून असून आवडलेले, सुचलेले काही लिहिण्यासाठी हाताशी कागद-पेनही सज्ज असतो. वयामुळे दृष्टी अंधुक झाली असली तरी पुस्तक नाकाजवळ आणून ते वाचन करतातच. ‘मला वर्तमानपत्र वाचण्याचे व्यसनच आहे. मला सकाळी वर्तमानपत्र मिळाले नाही तर चिडचिड होते. मी दिवसाला चार वर्तमानपत्रे वाचतो. पुस्तकेही आठवड्याला दोन किंवा तीन वाचतो. चरित्र वाचायला मला आवडते, पण मी इतरही अनेक प्रकारची पुस्तके वाचतो,’ असे बाँड सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT