YS Sharmila Reddy nominated from Kadapa Names of 17 candidates announced by Congress lok sabha poll 2024 Sakal
लोकसभा २०२४

वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना कडप्पातून उमेदवारी; काँग्रेसकडून १७ उमेदवारांची नावे जाहीर

काँग्रेसने आज आंध्रप्रदेश, बिहार, ओडिशा व पश्चिम बंगालमधील १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात आंध्रप्रदेशातील कडप्पा मतदारसंघातून आंध्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना उमेदवारी घोषित केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसने आज आंध्रप्रदेश, बिहार, ओडिशा व पश्चिम बंगालमधील १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात आंध्रप्रदेशातील कडप्पा मतदारसंघातून आंध्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना उमेदवारी घोषित केली आहे.

काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात आंध्रप्रदेश व ओडिशाच्या लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. आंध्रप्रदेशचे माजी मुख्य वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या कडप्पा या पारंपारिक मतदारसंघातून काँग्रेसने त्यांच्या कन्या वाय. एस. शर्मिला रेड्डी यांना उमेदवार घोषित केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांना काकीनाडामधून उमेदवारी दिली आहे. खासदार महम्मद जावेद यांना बिहारमधील किशनगंज या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. कटिहारमधून माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर तर भागलपूरमधून अजित शर्मा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

ओडिशातील काँग्रेसचे एकमेव खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांना पुन्हा कोरापूट येथूनच उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. मुनीश तमांग यांना दार्जिलिंगमधून उमेदवारी दिली आहे.

त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आंध्रप्रदेश व ओडिशाच्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आंध्रप्रदेशातील ११४ तर ओडिशातील ४८ उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. या दोन्ही राज्यांमध्ये अनुक्रमे चौथ्या व पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

भाजपचे खासदार काँग्रेसमध्ये

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील भाजपचे खासदार अजय निषाद यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सलग दोन निवडणुकांमध्ये अजय निषाद यांनी भाजपचे खासदार म्हणून निवडणूक जिंकली होती. परंतु यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. आपण उमेदवारी मागण्यासाठी आलो नाही. काँग्रेस विचारांमुळे आपण राहुल गांधी यांनी भेट घेतली होती, असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT