Loksabha Election Voting sakal
Loksabha 2019

Loksabha Election Voting : मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून... ; एक मत नोंदविण्यासाठी तुडवली घनदाट जंगलातील १८ किमीची वाट

देशातील प्रत्येक मतदाराला त्याचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून हरप्रकारे प्रयत्न केले जातात. भारताचे भौगोलिक वैविध्य पाहता काही भागांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना प्रचंड शारीरिक कष्ट सोसावे लागतात.

सकाळ वृत्तसेवा

इडुक्की (केरळ) : देशातील प्रत्येक मतदाराला त्याचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून हरप्रकारे प्रयत्न केले जातात. भारताचे भौगोलिक वैविध्य पाहता काही भागांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना प्रचंड शारीरिक कष्ट सोसावे लागतात. केवळ सोय उपलब्ध नाही म्हणून कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी या अधिकाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या काळजीचे आणि परिश्रमाचे उदाहरण केरळमधील इडुक्की जिल्ह्यात दिसून आले.

केवळ एका मताची नोंद करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी १८ किलोमीटरची वाट तुडवली. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज केरळमध्ये मतदान झाले. इडुक्की जिल्ह्यामधील इडामलाक्कुडी हे गाव गर्द झाडींनी वेढलेल्या डोंगरमाथ्यावर आहे. या गावात ९२ वर्षांचे शिवलिंगम राहतात.

वयामुळे ते अंथरूणावर पडून असले तरी मतदान करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी घरातूनच मतदान करण्यासाठी अर्ज भरला होता. त्यांचा अर्ज जिल्हा निवडणूक विभागाने मंजूर करत त्यांचे मत नोंदवून घेण्यासाठी नऊ अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले. या पथकामध्ये तीन महिलाही होत्या. शिवलिंगम यांच्या घरापर्यंत जाण्याचा पथकाचा मार्ग सोपा नव्हता. घनदाट जंगलातून १८ किलोमीटरची वाट त्यांना तुडवायची होती. या जंगलात हिंस्र प्राणीही आहेत.

केवळ दहा घरांचे गाव

हे पथक मुन्नारहून बुधवारी सकाळी सहा वाजता वाहनाने निघाले. इराविकुलम राष्ट्रीय उद्यानातून जात ते इडामलाक्कुडी गावासाठी जिथून पायवाट सुरू होते, त्या केप्पाकडु या वस्तीपाशी आले. येथून पुढील जंगलातील वाट बिकट होती.

वन्यप्राण्यांचा वावर असणाऱ्या या जंगलातील दाट झाडींमधून, कोळ्यांच्या चिकट जाळ्यांमधून आणि निमुळत्या वाटांतून मार्ग काढत ते दुपारी दीड ते दोनच्या सुमारास इडामलाक्कुडी आदिवासी गावात पोहोचले. हे जेमतेम दहा उंबरठ्यांचे गाव आहे. अधिकारी पोहोचले तेव्हा एकही व्यक्ती बाहेर दिसत नव्हता. त्यामुळे शिवलिंगम यांचे घर कोणते हे त्यांना समजत नव्हते. कसेबसे घर त्यांनी शोधले. मातीपासून बनविलेले त्या घरात शिवलिंगम खाटेवर पडून होते. अधिकारी घरात आले तरी त्यांना बसून त्यांचे स्वागत करता येत नव्हते. शिवलिंगम यांना सोयीचे जावे म्हणून अधिकाऱ्यांनी त्यांच्या खाटेशेजारीच बूथची रचना केली, जेणेकरून त्यांना गुप्तपणे मतदान करता येईल.

त्याच दिवशी परतीचा प्रवास

मतदान केल्यावर शिवलिंगम यांच्या डोळ्यांत पाणी तरारले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या गावात दुपारचे भोजन केल्यानंतर पावसाची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांनी लगेचच परतीचा मार्ग धरला. प्रचंड थकवा आणि अंग दुखत असतानाही त्यांनी पुन्हा १८ किमीचा प्रवास पूर्ण केला. एक आव्हानात्मक काम पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Meeting: काय स्वस्त अन् काय महाग होणार? GST परिषदेच्या बैठकीत मध्यमवर्गाला दिलासा मिळणार की धक्का बसणार?

Parivartini Ekadashi 2025: परिवर्तिनी एकादशीला तुळशीपूजन अन् धूप दानाचे जाणून घ्या महत्त्व

भाजप आमदारानं फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी सुनावणी दुसऱ्या बेंचकडे सोपवली

'या' अभिनेत्रीला 102 कोटी दंड भरण्याची डीआरआयनं बजावली नोटीस; दुबईहून सोन्याची तस्करीप्रकरणी करण्यात आलीये अटक

Sara Tendulkar: 'शुभमन गिलसोबत धोका...'! सारा गोव्याला कोणासोबत गेली होती? सिद्धार्थ केरकर कोण? नेटिझन्सकडून गिलची खिल्ली...

SCROLL FOR NEXT