pune
pune 
Loksabha 2019

Loksabha 2019 : मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पनवेल : पनवेलमधील सुकापूर आणि देवद गावात पैसे वाटपाचे प्रकरण समोर आले. यामध्ये सुकापुरतून राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यास तर, देवद येथून शिवसेनेच्या कार्यकर्त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. या कार्यकर्त्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

निवडणूक भरारी पथक क्रमांक 5 मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख महेंद्र गगलानी आणि प्रभाग प्रमुख विनोद मोहरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. सुकापुर येथे अटक करण्यात आलेला व्यक्ती राष्ट्रवादी आघाडीचा कार्यकर्ता असुन त्याचे नाव प्रताप रामचंद्र आरेकर असे आहे. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती विठ्ठल मंदिर सुकापूर येथे राहते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३ मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या ७८ कोऱ्या व मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे ५८०० रुपये रोख रक्कम असलेले २९ खाकी लिफाफे सापडले. प्रत्येक लिफाफ्यात २०० रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय त्याच्याकडे एक लाल रंगाची पिशवी होती आणि त्यात १७८ पानी रजिस्टर व त्यात साक्षी पार्क, जन्मोत्री, गोकुळधाम सोसायटी, श्रीनिकेतन, तपोवन, मातोश्री, साईकृपा, स्वर्णभूमी, सुंदरम सोसायटी अशी नावे व सदस्यांची नावे आढळली. 

तर देवद येथे ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत असुन अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संजय पाटील असे आहे. त्यांच्याकडून 26 हजार 100 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीं विरोधात मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी पोलिसांनी भा.द.वि.सं कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

काल सायंकाळी कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोघां कार्यकर्त्याविरुध्द देखील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत द्वारकामधील पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

SCROLL FOR NEXT