Loksabha 2019

Loksabha 2019 : भाजप केवळ मोदी-शहांचा पक्ष नाही : गडकरी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ही व्यक्तिकेंद्रित नाही. तर विचारांवर उभा राहिलेला हा पक्ष म्हणून आहे. हा पक्ष केवळ नरेंद्र मोदी-अमित शहांचा नाही, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच हा पक्ष ना कधी अडवणींचा बनू शकला ना कधी अटलजींचा बनला. म्हणून भाजप हा पक्ष केवळ मोदी-शहांचा बनू शकत नाही, कारण हा पक्ष व्यक्तिकेंद्रित नाही, असेही ते म्हणाले.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) सर्वाधिक मताधिक्याने विजय होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार स्थापन होईल. आम्ही आता भाजपचे नाहीतर एनडीएचे सरकार स्थापन करू. तसेच जर आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू शकलो तरीदेखील आम्ही एनडीएचे सरकार स्थापन केल्याचे मानून त्यानुसार एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहोत. 

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही. तशी माझी इच्छा किंवा त्याबाबत माझा कोणाताही अजेंडाही नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी पंतप्रधानपदाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच नरेंद्र मोदी हे आमचे आहेत. ते पंतप्रधान होतील, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT