abdul sattar 
Loksabha 2019

Loksabha 2019 : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचे बंडाचे निशाण

माधव इतबारे

औरंगाबाद : लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघातून कॉंग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशान उभारले आहे. "मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही, पण लोकशाहीने लढण्याचा अधिकार सर्वांना दिला आहे. आता माझा कॉंग्रेससोबत संबध नाही. मी अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढविणार' असे वक्तव्य त्यांनी शनिवारी (ता. 23) केले. 

लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची उत्सुकता शुक्रवारी (ता. 22) मध्यरात्री संपली. मात्र आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासात पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली. जिल्हाध्यक्ष श्री. सत्तार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "मी यापूर्वीच आमदारकीचा व जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे नव्याने राजीनामा देण्याची गरज नाही. आगामी लोकसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार आहे.' आपण नाराज आहात का? अशी विचारणा केली असता, मी कोणावरच नाराज नाही. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे, असे त्यांनी नमूद केले. 

आता माघार नाही 
मनधरणी करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांचे फोन येतील, मात्र आता मी माघार घेणार नाही, तीन-चार दिवसात आमखास मैदानावर समर्थकांचा मेळावा होईल, असेही श्री. सत्तार म्हणाले. दरम्यान आमदार झांबड यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. झांबड यांच्याबद्दल सत्तार नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याला सत्तार यांनी दुजोराही दिला होता. पक्षाने झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळेच सत्तार यांनी बंडाचे निशान उभारले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT