parrikar
parrikar 
Loksabha 2019

पर्रीकरांच्या पणजी मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व

सकाळवृत्तसेवा

पणजी : मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर    कॉंग्रेसचे उमेदवार आतानासिओ ( बाबुश) मोन्सेरात यांनी विजयाला गवसणी घातली आहे. अधिकृत निकाल जाहीर झाला नसला तरी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मोन्सेरात यांनी सोळाशेहून अधिक मताधिक्क्य मिळवले आहे.

पर्रीकर यांचे १७ मार्चला निधन झाले होते. त्यामुळे पणजी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक १९ मे रोजी पार पडली होती. पर्रीकर यांनी २५ वर्ष पणजी मतदारसंघ ताब्यात ठेवला होता. मुख्यमंत्रीपद त्यागून २०१५ मध्ये केंदात संरक्षणमंत्री बनल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपचे सिध्दार्थ कुंकळ कर हे निवडून आले होते. त्यावेळी मोन्सेरात हे युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारीवर लढले होते आणि कुंकळकर यांनी त्यांचा ११०५ मतांनी पराभव केला होता.

मनोहर पर्रीकरांच्या पश्चात भाजपला आपला गड राखता आला नाही. पर्रीकर यांचे ज्येष्ठ पुत्र उत्पल यांना भाजपने उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु पक्षाने उत्पल यांना उमेदवारी डावलून कुंकळकर यांना दिली होती. पर्रीकरांची जागा राखता आली नसल्याने भाजपला मोठा फटका बसला आहे. सरकारच्या स्थैर्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT