Loksabha 2019

Loksabha 2019 : 56 इंचाच्या पंतप्रधानांना मनसेकडून 56 मार्कांची प्रश्नपत्रिका!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक सभांमध्ये 56 इंचाच्या छातीचा उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 56 मार्कांची प्रश्नपत्रिकाच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये चौथ्या टप्पातील मतदानापूर्वी म्हणजे सोमवार (ता.29) दोन तासांचा अवधी दिला गेला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता मनसेकडून थेट प्रश्नपत्रिकाच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रश्नपत्रिकेत विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये 15 लाखांचे आश्वासन, कोणता नेता शेतकऱ्यांना 'साले' म्हणाले, यांसारखे विविध प्रश्न विचारण्यात आले आहे.

तसेच 200 ते 250 शब्दांत निबंधासाठी 'मी पुलवामामधील शहीद बोलतोय', 'चहावाला ते चौकीदार', 'विकास' वेडा झालाय आणि 'खोटे बोलणे' सवय की आजार अशा स्वरूपाचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT