Loksabha 2019

Loksabha 2019 : वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपण्याचा मोदींचा प्रयत्न : मनसे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारले. मग कर्नाटकने त्यानंतर आता पाच राज्यातील जनतेने नाकारले होते. आता मोदींच्या कोणत्याही क्लुप्त्या काम करणार नाहीत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्विट करण्यात आले. तसेच भारतीय सैन्य आणि वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपविण्याचा प्रयत्न भारतातील जनतेच्या लक्षात आला आहे, असे म्हटले आहे.

मनसेच्या या ट्विटमध्ये एका वृत्ताचे उदाहरण देण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेरठमधील सभेचा उल्लेख करण्यात आले असून, या सभेत पहिल्या रांगेत नागरिकांची मोठी गर्दी दिसत होती. मात्र, शेवटच्या रांगेतील खुर्च्या अक्षरश: रिकाम्या पडल्या होत्या. 

या वृत्ताचा संदर्भ देत मनसेने ट्विट केले, की मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारले. मग कर्नाटकने, त्यानंतर पाच राज्यातील जनतेने नाकारले. मोदींच्या आता कोणत्याच क्लुप्त्या काम करणार नाहीत. मोदी सरकारने स्वतःच अपयश सैन्याच्या, वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपविण्याचा केलेला प्रयत्न भारतीय जनतेच्या लक्षात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT