wada
wada 
Loksabha 2019

Loksabha 2019 : सुरेश टावरे यांच्या निवडीचा पुर्नविचार करावा - विश्वनाथ पाटील

सकाळवृत्तसेवा

वाडा - काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील यांनी जाहिर विरोध केला. टावरे यांच्या उमेदवारीचा पक्षाने पुर्नविचार करावा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली असून, तसे न झाल्यास वेगळी भूमिका जाहिर करू असा निर्वाणीचा इशारा पत्रकार परिषदेत विश्वनाथ पाटील यांनी दिला.

सुरेश टावरे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवण्यासाठी वाड्यातील हॉटेल स्नेहगार्डन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील इशारा दिला. 

विश्वनाथ पाटील हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप सुरेश टावरे यांनी केला असून, त्या आरोपाचे खंडन करताना विश्वनाथ पाटील म्हणाले की आमचे घराने हे वाडवडिलांपासून कांग्रेस पक्षाशी निष्ठावंत असून मी भारतीय जनता पक्ष सोडून रितसर काँग्रेसमधे प्रवेश केला आहे. आणि त्याचीच पावती म्हणून काँग्रेसने 2014च्या लोकसभेची उमेदवारी मला दिली होती, त्यामुळे टावरे हे माझ्यावर करत असलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले. 

2019 च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमधे काँगेसने सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र सुरेश टावरे यांच्या विरोधात मतदार संघात तीव्र नाराजी असून विश्वनाथ पाटील यांनी दंड थोपटले आहेत. टावरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष असतानाही जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यामध्ये कुठल्याही प्रकारची सत्ता मिळवता आलेली नाही. हे टावरे यांचे अपयश असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. टावरे यांनी आजवर भिवंडीचे महापौर जावेद दळवी, मुज्जफर हुसेन, गुरुनाथ टावरे, शोएब गुड्डू यांच्या विरोधात निवडणूक काळात विरोधी काम करून दुसऱ्या पक्षाला मदत केल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

विश्वनाथ पाटील पुढे म्हणाले कार्यकर्त्यांकडून मतदार संघात गावबैठका सुरु असून, जनमत जाणून घेऊन शहापुर येथे 1 एप्रिल रोजी जाहिर सभा घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेमधे दिली.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नेते पराग पष्टे, काँग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, कैलास पाटील, युवराज ठाकरे, आत्माराम भोईर, राजन नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT