Loksabha 2019

LokSabha 2019 : निष्ठा वगैरे गेली उडत; फक्त सत्ता हवी! 

दत्तात्रय जाधव

राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून जालना येथील 'ई सकाळ'चे वाचक दत्तात्रय जाधव यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत!

महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने सत्ताधारी पक्षाचे 'गाजर' गळ्यात बांधून घेतले आणि सगळ्यांना जणू आश्‍चर्याचा धक्काच बसला..! मुळात स्वत:चे वडील विरोधी पक्षनेते असताना आणि आजोबांनी उभं आयुष्य राजकारणात घालवलेले असताना या मुलाला सत्ताधारी पक्षात प्रवेश करायला काहीच कसं वाटू नये? 

बरं.. विशेष म्हणजे, 'माझा मुलगा काहीच ऐकण्याच्या मानसिकतेत नाही' असं सांगून दस्तुरखुद्द त्या वडिलांनीच हात वर करावे? या सगळ्या गोंधळात त्या कार्यकर्त्यांचं काय, जे काँग्रेसशी निष्ठेने वागले..? 

यावरून एकच गोष्ट लक्षात येते.. ती म्हणजे या नेत्यांना सत्तेशिवाय करमत नाही.. बाकी निष्ठा वगैरे गेली उडत..! आणि हो.. विरोधी पक्षनेत्याचाच मुलगा भाजपमध्ये जाऊन उमेदवारी मिळवितो म्हणजे त्या मुलाचा स्वत:च्या वडिलांवर आणि त्यांच्या 'आघाडी'वरही विश्‍वास नाही.. तसंच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही, याचा अंदाज आल्यानेच डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश केला.. त्यामुळे आता पुन्हा एकदा युतीचेच सरकार येणार, हे स्पष्ट झाले आहे. 

........................................................................

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भाजपशी लढण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर पक्षांतर्गत नाराजीचेच आव्हान मोठं आहे, असं दिसायला लागलं आहे. 

या सगळ्या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटते? 

  • मुख्यमंत्री फडणवीस हे यंदाची निवडणूक भाजपच्या बाजूने फिरवू शकतील? 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडीशिवाय आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसमोर फडणवीस यांचे आव्हान असेल का? 
  • विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर काय अडचणी येतील? 
  • यंदाच्या निवडणुकीत वारं कुठं वाहत आहे? 

विश्‍लेषण फक्त पत्रकारांनीच करावं, असं थोडंच आहे! तुम्हीही बिनधास्त मांडा तुमची मतं आणि निरीक्षणं.. किमान 150 शब्दांत लेख लिहा आणि ई-मेल करा webeditor@esakal.com इथे आणि सब्जेक्‍टमध्ये लिहा 'माझे विश्‍लेषण'! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT