evm 
Loksabha 2019

बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल?

वृत्तसंस्था

पाटणा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी 23 मे ला होईल, त्यापूर्वीच ईव्हीएम मशीनच्या अदलाबदलीच्या घटना वाढत आहेत. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये मतमोजणीपूर्वीच ईव्हीएम मशीनची अदलाबदल केली जात असल्याची शंका आहे. सोमवारी (ता. 20) राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनने भरलेला ट्रक पकडला. 

सारण व महाराजगंज येथील स्ट्राँगरूममध्ये बेकायदेशीररित्या शिरणारा हा ट्रक राजद-काँग्रेसच्या नेत्यांनी पकडला व त्याला आत जाण्यास रोखले. राजदने ईव्हीएमने भरलेल्या या ट्रकचा फोटो काढत तो ट्विट केला आहे. या ट्रकसोबत तेथील गटविकास अधिकारी होते, पण त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते. त्यामुळे या अशा फिरणाऱ्या ट्रकवर प्रश्न उपस्थित राहणे सहाजिक आहे. प्रशासनाचा हा कसला खेळ?, असा सवाल करत ट्विट राजदने केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बसपच्या उमेदवाराने सांगितले की, या स्ट्राँगरूममध्ये जाणाऱ्या गाड्यांना नंबरप्लेटही नव्हत्या. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी व गटबंधनच्या कार्यकर्त्यांनी या गाड्या अडवून धरल्या व आंदोलन केले. दरम्यान उत्तर प्रदेशमधील चंदौली व गाजीपुर येथेही ईव्हीएमच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: कर्ज फेडूनही शेतकऱ्याच्या घराला ठोकले कुलूप! २० लाखांचे कर्ज; १६ ते १७ लाख भरूनही आणखी १२ लाखांची मागणी

Narayan Surve Poetry : संघर्षातून सृजनशीलतेचा उजेड निर्माण करणारे नारायण सुर्वे; त्यांच्या कवितांचा वेगळा अर्थ सांगणारे पुस्तक

Maharashtra Farmer Relief: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात अग्रीम मदतीचे वाटप सुरू; बार्शीतील दहा जणांना पहिला लाभ

Bhiwandi Crime: ऑनड्युटी अचानक गायब, ३० तासांपासून बेपत्ता; विजय सेल्सच्या वॉचमनचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं?

Sangli District Bank Election : गोपीचंद पडळकर, संजय पाटील, सुमनताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला, सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरूवात

SCROLL FOR NEXT