Loksabha 2019

Loksabha 2019 : लोकसभेसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर

सकाळन्यूजनेटवर्क

पणजी : शिवसेनेने आज लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर करत गोव्यातील दोन्ही जागांवरील उमेदवारांचीही घोषणा केली. शिवसेनेचे गोवा संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून राज्य उपाध्यक्षा राखी प्रभुदेसाई नाईक या निवडणूक लढवतील, असे जाहीर केले. 

शिवसेनेने 2017 मधील विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंच या पक्षाशी युती केली होती. आता त्या पक्षाने शिवसेनेला विश्वासात न घेता तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्याबाबत आज राऊत यांनी सांगितले, की विधानसभा पोटनिवडणुकीत मांद्रे मतदारसंघातून शिवसेना गोवा सुरक्षा मंचासोबत युतीने लढण्यास इच्छुक आहे, त्यासाठी आवश्‍यक ती चर्चा गोवा सुरक्षा मंचाचे पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्याशी केली जाईल. 

शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले, तर कोणाला पाठिंबा देणार या प्रश्‍नावर नैसर्गिकपणे आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असल्याने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचेच समर्थन करणार, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, की लोकसभेसाठीचे आमचे उमेदवार नवे असले तरी पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे चिन्ह लोकांसमोर जाण्यासाठी सातत्याने निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. कार्यकर्त्याने किती काम केले हे जोखण्यासाठी निवडणूक लढवणे हाच मार्ग असतो. 

भाजपने चर्चा करावी 

महाराष्ट्रात भाजपसोबत युती आहे, मग येथे भाजपविरोधात लढणार का, असे विचारल्यावर राऊत म्हणाले, की भाजपसोबतची युती ही जुनी युती आहे. मध्यंतरी ती नव्हती हेही खरे आहे. मात्र, सर्व कालावधीत शिवसेना उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगण, जम्मू-काश्‍मीर आणि गोव्यात स्वतंत्रपणे लढत आली आहे. त्यामुळे आताच आम्ही गोव्यात स्वतंत्र लढतो असे नाही. तरीही भाजपला गोव्यात आमच्याशी युती करावी असे वाटत असेल, तर त्यांच्या नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT