shringare 
Loksabha 2019

Loksabha 2019 : सुधाकर शृंगारेंना उमेदवारी मिळाल्याने वडवळमध्ये जल्लोष

संतोष आचवले

वडवळ नागनाथ (लातूर) : लातूर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर पक्षाने गुरुवारी (ता. 21) विद्यमान खासदारांचा पत्ता कट करून जिल्हा परिषदेच्या वडवळ नागनाथ गटाचे विद्यमान सदस्य तथा गावचे भुमीपूत्र सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर वडवळसह गटातील सर्वच गावात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून एकच जल्लोष केला. 

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भारतीय जनता पार्टीतर्फे लातूरच्या विद्यमान खासदार डाॅ. सुनील गायकवाड यांचा पत्ता कट होणार? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने गुरुवारी रात्री महाराष्ट्रासह देशातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात लातूर लोकसभेसाठी जिल्हा परिषदेच्या वडवळ नागनाथ गटाचे विद्यमान सदस्य श्री.शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करताच आपल्या भूमिपुत्राला लोकसभा निवडणूूक लढविण्यासाठी देशातील एका मोठ्या पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यात समाधान व्यक्त होत आहे.

वडवळ नागनाथ गटातील घरणी (ता.चाकूर) येथील अत्यंत सामान्य कुटूंबात सुधाकर शृंगारे यांचा जन्म 5 मे 1962मध्ये झाला. बीएससी पदवीधर असलेले शृंगारे  मुंबईला बांधकाम व्यवसायिक असून, एक दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या या भुमीपुत्राला गेल्या काही वर्षांपासून आपली जन्मभूमी आणि परिसराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. यातूनच आमदार विनायकराव पाटील यांनी त्यांना राजकारणात आणुन जिल्हा परिषदेच्या वडवळ नागनाथ गटातून सदस्य म्हणून निवडून आणल्यानंतर काही महिन्यांतच श्री. शृंगारे यांनी पाच वर्षापासून निधीअभावी रखडलेल्या वडवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेमार्फत निधी मंजूर करून घेतला आज त्याचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू असून, याचा आनंद वडवळकरांना आहे. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शृंगारे यांनी शासनाचा निधी खेचून आणून गटातील सर्वच गावात विविध विकास कामे केली आहेत. घरणी येथे कोट्यावधी रुपये खर्चून कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम तसेच महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात नाला सरळीकरणाची कामे झाली आहेत.  याशिवाय लातूर लोकसभा मतदारसंघात वैयक्तिक निधीतून अनेक गावात विंधन विहिरी घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवला. लातूर येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरातील रुग्णांना अन्नदान केले. शृंगारे यांना उमेदवारी जाहिर होताच वडवळसह घरणी, लातूररोड, मोहनाळ, आष्टा येथे जल्लोष करण्यात आला. येथील महात्मा बसेश्वर चौकात भाजपाचे तालुका उपाध्यक्ष माणिकराव हलिंगे यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या सरिता मठपती, दयानंद पाटील, सचिन मठपती, संजय स्वामी, महादेव सुवर्णकार, अशीष वाडकर, मच्छिंद्र कसबे, इंद्रजित सोरटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : "हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही"- सुजात आंबेडकर

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT