Amol Kolhe
Amol Kolhe 
Loksabha 2019

LokSabha 2019 : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका बंद होणार नाही; कोल्हेंना दिलासा

सकाळवृत्तसेवा

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका निवडणुकीच्या काळातही सुरू राहणार आहे. उमेदवाराची भूमिका असलेली मालिका ही खासगी वाहिनीवर सुरू असल्यास प्रक्षेपण थांबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हे यांची मालिका बंद केली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

असे असले तरी जर कोल्हे यांना मालिका सुरू ठेवायची असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर देण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या दराने पैसे भरावे लागतील. अन्यथा चित्रीकरणातून अमोल कोल्हे यांना काढावे लागेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी. या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही मालिका त्वरित बंद करावी, अशी मागणी आंबेगाव तालुक्‍यातून मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मेलद्वारे करण्यात आली होती. 

भावनिक भूमिकेचे राजकारण करून समाजाची दिशाभूल करण्याचे काम होत आहे. मालिकेला विरोध नसून अमोल कोल्हे निवडणूक लढविणार असल्याने त्याचे प्रक्षेपण थांबवावे; तसेच अमोल कोल्हे यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करावी,' अशी तक्रार मेल मध्ये करण्यात आली होती.

यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मालिका बंद केली जाणार नसल्याचे सांगितल्याने कोल्हेंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT