Udaynraje-bhosale
Udaynraje-bhosale 
Loksabha 2019

LokSabha 2019 : होळीच्या मुहूर्तावर उदयनराजे दक्षिणेच्या स्वारीवर 

सचिन शिंदे

कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले यांनी होळीचा मुहूर्त साधत दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छींद्र सकटे, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील अशा अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची येथे जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांनी कऱ्हाड शहरातील अनेक राजकिय लोकांच्या गाठीभेटी घेत प्रचाराची साखर पेरणी केली. सभेला गर्दी व्हावी, यासाठी खासदार गट सातारा जिल्ह्यात आखणी करत आहे. खासदार उदयनराजे यांनी मात्र कऱ्हाड व पाटण तालुक्यातून जास्तीत जास्त लोक यावीत, यासाठीचा चंग बांधला आहे. त्यामुळे रविवारच्या सभेची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.

खासदार उदयनराजे यांच्या विरोधात शिवसेनेचे पुरूषोत्तम जाधव यांचे नाव जवळजवळ निश्चीत असले तरी अद्यापही ते जाहीर झालेले नाही. मात्र राष्ट्रवादीतून खासदार उदयनराजे यांची घोषणा झाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराची रणधुमाळी उठवली आहे. खासदार उदयनराजे यांनी विशेष करून कऱ्हाड, पाटण तालुका लक्ष करत प्रचाराची बहुतांशी ताकद कऱ्हाड तालुक्यात तीही कऱ्हाड दक्षिणेत लावली आहे. कऱ्हाड उत्तर व पाटण तालुक्यात त्यांचा संपर्क गतवेळेपेक्षा वाढला आहे. मात्र, खासदार उदयनराजे कऱ्हाड दक्षिणेतील गाठीभेटी घेत आहेत. त्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. उदयनराजे यांच्या आठवड्यात चार फेऱ्या दक्षिणेत झाल्या आहेत. त्यातही विशेष करून कऱ्हाड शहरातील त्यांच्या भेटी सध्या चर्चेत आहेत. मित्र पक्षांच्या नेत्यांसह त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही भेटण्याचा सपाटा लावला आहे. त्यात राजकारणातील 'हुज हू' ठरणाऱ्या नेत्यापर्यंत ते पोचण्याच्या प्रयत्नात आहेत. 

खासदार उदयनराजे यांनी होळीचा मुहूर्त साधत येथे अनेक महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, हा त्याचाच एख भाग होता. त्या भेटी राजकीयच आहेत. मात्र, त्या भेटीत महत्वाची भेट ठरली म्हणजे दलीत महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छींद्र सकटे यांची. खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. त्यांनी प्रा. सकटे यांच्याशी विशेष गोष्टीवर चर्चा केली. मात्र त्यांच्या भेटीत त्यांनी दिलेल्या होळीच्या शुभेच्छांची जोरदार चर्चा आहे. प्रा. सकटे यांना घरी आहात का, मी भेट घ्यायला येतोय... असे म्हणत खासदार उदयनराजे थेट त्यांच्या निवासस्थनी पोचले. त्यावेळी त्यांच्या सोबत कऱ्हाड येथील यशवंत विकास आघाडीचे नगरसेवक राजेंद्र यादव, बांधकाम सभापती हणमंत पवार होते. महासंघाचे प्रकाश वायदंडे व त्यांच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनीही खसादर उदयनराजे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी खासदार उदयनराजे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. 

खासदार उदयनराजे यांचे दत्त चौकात स्वागत झाले. यावेळी शहर कॉग्रेसतर्फे नगरसेवक शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने यांनी स्वागत केले. आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, यशवंत आघाडीचे नेते यादव यावेळी उपस्थीत होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभेच्या ठिकाणाची पहाणी केली. खासदार उदयनराजे यांनी शहरातील त्यांच्या गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. त्यांनी जबाबदारीचे वाटप करत काही प्रत्येक मतदार संघ निहाय समन्वयक म्हणून नेमणूकही केली. शरद पवार यांच्या सभेला गर्दी झाली पाहिजे, यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कामाला लागली आहे.

मतदान टक्का वाढविण्यासाठी दक्षिणस्वारी 
लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणेतून खासदार उदयनराजे यांना कमी मते मिळाली होती. घसरलेला मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. यासाठी खासदार गटाने कऱ्हाड दक्षिणवर लक्ष केद्रीत केले आहे. त्यात स्वतः उदयनराजे यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच त्यांच्या प्रचारातील पहिली मोठी सभाही येथे होत आहे. रविवारी होणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला विक्रमी गर्दी करण्याचे उद्धीष्ठ आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT