Loksabha 2019

Loksabha 2019 : स्टाईल आहे स्टाईल; उदयनराजेंची कॉलर शरद पवारांनी केली 'टाईट'

सकाळवृत्तसेवा

सातारा : मी जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय बोलत नाही. मला सगळ्यात जास्त पाठिंबा पवारसाहेबांचा आहे. रामराजे निंबाळकर यांचा तर मला कॉलेजच्या काळापासून पाठिंबा आहे. मी आतापर्यंत अन्याय सहन केलेला नाही आणि यापुढे सहन करणार नाही. एक बार जो मैने कमेंटमेंट कर दी, तो मै अपनी खुद की भी नही सुनता, स्टाईल आहे स्टाईल असे म्हणत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली कॉलर उडवली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा प्रारंभ आज (रविवारी) कऱ्हाडात सभा झाली. यावेळी खासदार शरद पवार, विधान परिषेदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जोगेंद्र कवाडे, हसन मुश्रिफ, विक्रमसिंह पाटणकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, सुमन पाटील, प्रभाकर घार्गे, इंद्रजित मोहिते, सत्यजित पाटणकर, देवराज पाटील आदी उपस्थित होते. 

उदयनराजे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीला चित्रपटातील संवाद म्हणत एकप्रकारे विरोधकांना टोला लगाविला. यावेळी उदयनराजे जागेवर बसल्यानंतर शरद पवारांनी यांनी त्यांची पाठ थोपटत पुन्हा एकदा त्यांची कॉलर टाईट केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT