Loksabha 2019

Loksabha 2019 : मोदींच्या 'रोड शो'साठी सुमारे दीड लाख लिटर पाण्याचा वापर

वृत्तसंस्था

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मोदींनी काल (गुरुवार) भव्य 'रोड शो' केला. त्यांच्या या रोड शोपूर्वी रस्ते धुण्यासाठी एक लाख 40 हजार लिटर पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वाराणसीतील 30 टक्के घरांमध्ये नळाने प्यायचे पाणी येत नाही. असे असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय केवळ रस्ते धुण्यासाठी केल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे. याबाबत एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत येण्यापूर्वी शहरातील रस्ते धुवून काढण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते. त्यांच्या या आदेशानंतर आम्ही ही कार्यवाही केली. 

दरम्यान, मोदींच्या रोड शोपूर्वी वाराणसी महापालिकेने 40 टँकर आणि 350 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील सर्व रस्ते चकाचक केले, असेही समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT